PM Modi Visit In Pune : शरद पवार-अजित पवार एकत्र येणार; निमित्त ठरणार नरेंद्र मोदी

Ajit Pawar - Sharad Pawar On One Stage : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंड घडवून आणले गेले; या बंडाला भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने ताकद दिली.
Sharad Pawar| Narendra Modi| Ajit Pawar
Sharad Pawar| Narendra Modi| Ajit Pawar
Published on: 
Updated on: 

Pune News: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंड घडवून आणले गेले; या बंडाला भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने ताकद दिली. खुद्द गृहमंत्री अमित शहांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना गळाला लावले, पक्षाध्यक्ष शरद पवारांना धक्का दिला. दोन्ही पवार वेगळे झाले. भाजपच्या साथीला गेलेले अजितदादांनी थोरल्या पवारांवरच फैरी झाडल्या. त्यानंतरही अजितदादांसह फुटलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांच्या भेटी घेतल्या. तरीही दोन्ही पवारांत ना समेट घडला, ना काही झाले. पण ज्या भाजपमुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले; त्याच भाजपचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादीतील बंडाळीनंतर दोन्ही पवार पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. तेही राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच पुण्यात मोदींसोबत दोन्ही पवार एकाच व्यासपिठावर बसलेले दिसण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar| Narendra Modi| Ajit Pawar
Narendra Modi Pune Visit : 'इतिहासातील अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या...; पुण्यात येण्याआधीच मोदींचे ट्विट चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरविले जाणार आहे. त्यासाठीचा मुख्य कार्यक्रम सरपरशुराम महाविद्यालयांत होणार असून, त्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही पुण्यात दाखल झाले असून, नवे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही या कार्यक्रमात येणार आहेत. राष्ट्रवादीतील बंड, नवे सरकार आणि अजिदादा गटाचा पक्षावरचा दावा या घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पवार पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकत्र येणार आहेत.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेनेने टोकाचा विरोध केल्याने हा दौरा चर्चेत आला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहून ते मोदींसोबत स्टेजवर बसणार असल्याने विरोधकांत अस्वस्थता पसरली आहे. त्यावरून शिवसेनेने उघडपणे नाराजी मांडली आणि पवारांना सल्लेही दिले. महाविकास आघाडीतील मतभेदांपेक्षा या शरद पवार आणि अजित पवार हे मोदींसोबत एकत्र येणार आहेत. केवळ विरोधकांचा मोदींच्या दौऱ्याला विरोध म्हणून या कार्यक्रमाकडे जेवढे लक्ष आहे, तेवढेच दोन्ही पवारांच्या एकत्र येण्याकडेही राजकीय वर्तुळाच्या नजरा राहणार आहेत.

Sharad Pawar| Narendra Modi| Ajit Pawar
PM Modi Pune Visit : भष्ट्राचाराचे आरोप केलेल्यांकडून मोदी पुरस्कार स्वीकारणार का ?; ठाकरे गटाचा सवाल

विशेष म्हणजे, मोदी, शिंदे, फडणवीसांसह व्यासपिठावर राहणार आहे. अशात दोन्ही पवार समोरासमोर येणार आहेत. याआधी शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजितदादा आणि त्यांच्या गटाच्या नेत्यांनी दोनदा पवारसाहेबांची भेट घेतली होती. मात्र, हे दोघेही कोणत्याही कार्यक्रमांत एकत्र आले नव्हते.त्याला मोदी दौऱ्याचे दौऱ्याचे निमित्त ठरले असून, लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमात दोन्ही पवार एकास ठिकाणी दिसतील.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.