Sharad Pawar Ajit Pawar Meeting : शरद पवार-अजित पवार आज पुन्हा एकत्र, 15 दिवसांत तिसरी भेट!

Sharad Pawar Ajit Pawar NCP : अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्यासाठी पवार कुटुंबीय काही दिवसांपूर्वी एकत्र आले होते. या घरगुती समारंभाला शरद पवार देखील उपस्थित होते
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pawar Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुन्हा एकत्र येणार आहेत. त्यांच्या एकत्र येण्याचे निमित्त पुण्यातील साखर संकुलातील तंत्रज्ञानाविषयी असलेल्या बैठकीचे ठरले आहे. ही बैठक आज (सोमवार) सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार दोघेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्यासाठी पवार कुटुंबीय काही दिवसांपूर्वी एकत्र आले होते. या घरगुती समारंभाला शरद पवार देखील उपस्थित होते. तेव्हा शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र दिसले होते. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत पुन्हा काका-पुतण्या एकत्र आले . या बैठकीचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता.

Sharad Pawar, Ajit Pawar
Sanjay Shirsat : ठाकरे बंधू एकत्र येणार? आधी शिंदेंचा पारा चढला अन् आता शिलेदार भडकला; म्हणाला, 'चांडाळ चौकडी...'

साखर संकुल येथे होत असलेल्या बैठकीत दोन्ही पवार एकत्र येत असले तरी या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत ते काय प्रतिक्रिया देतायत याची उत्सुकता असणार आहे. काल (रविवारी) शरद पवार हे पंढरपूरमध्ये होते तेथे त्यांनी यावर बोलण्याचे टाळले होते.

15 दिवसांत तिसऱ्यांदा एकत्र

शरद पवार आणि अजित पवार हे मागील दहा दिवसांत तिसऱ्यांदा एकत्र येणार आहेत. 6 एप्रिलला ते जय पवारांच्या साखपुड्यानिमित्त एकत्र आले त्यानंतर 12 एप्रिलला रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत एकत्रित आले होते. आता पुण्यातील साखर संकुल येथे होणाऱ्या बैठकीसाठी ते एकत्र येत असून तेथेही दोघांमध्ये काही संवाद होणार याची उत्सुकता असणार आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Raju Shetti : 1 वाटी आमरस, 1 मोदकाची किंमत दीड कोटी; मात्र शेतकऱ्यांसाठी काय? तटकरेंनी केलेल्या खर्चावर राजू शेट्टी भडकले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com