Sharad Pawar NCP : चिन्ह मिळताच शरद पवारांची पुण्यात पहिली बैठक; बारामतीसह 'या' मतदारसंघाची तयारी सुरू

Baramati Lok Sabha Election 2024 : शरद पवारांनी लोकसभेच्या सहा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट हे वारंवार आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही तेच चित्र पाहिला मिळण्याची शक्यता आहे. ज्या जागांवर शरद पवार गटाचा उमेदवार असेल त्या जागांवर अजित पवार गटाचा उमेदवार निवडणूक लढवण्याच्या तयारीत असणार आहे असे बोलले जात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर मावळ तसेच सातारा, म्हाडा आणि रायगड या मतदारसंघांमध्ये शरद पवार गट आपला उमेदवार देणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. (Sharad Pawar NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यामध्ये या लोकसभा मतदारसंघांमधील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. शरद पवारांकडून या मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काही सूचना करण्यात येणार आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही संघटनात्मक कामे दिली जाणार आहेत.

शरद पवारांचा हा गुरुमंत्र घेऊन पदाधिकारी या सहा मतदारसंघांमध्ये कामाला लागणार असल्याचे बोलले जात आहे. ही बैठक मंगळवारी सकाळी 11 वाजता पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात होणार आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी शरद पवार स्वतंत्र बैठक घेणारा असून स्वतंत्रपणे सूचनाही करणार आहे.

Sharad Pawar
Nitin Gadkari News : नितीन गडकरी म्हणाले, मला आजकाल आमदार, खासदार भेटायला येत नाहीत

या सहा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना बोलावले असले तरी सर्वांचे लक्ष हे बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघावर असणार आहे. या मतदारसंघांमध्ये होणारी लोकसभेची निवडणूक ही पवार कुटुंबीयांमध्ये होणार असल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) गट आणि शरद पवार गट या दोन्हीही गटांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. शरद पवार यांच्या सर्वाधिक लक्ष हे बारामती मतदारसंघावर आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी विशेष रणनीती शरद पवारांकडून आखली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Sharad Pawar
Basavraj Patil News : काँग्रेसचा बाल्लेकिल्लाच ढासळला; महिन्याभरातच मराठवाड्यात पक्षाला दोन मोठे धक्के

आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील दहा दिवसात कधीही लागू शकते. त्यामुळे निवडणूक अगदी तोंडावरती आली असताना सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला वेग आला आहे. लोकसभा मतदारसंघांमध्ये आपल्या पक्षांकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांची छाटणी करून नाव अंतिम करण्याची कार्यवाही सर्वच पक्षांकडून करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्षांनी सुरुवात केलेली असली तरी अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पक्षांमध्ये जागा वाटपाचा फार्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे कोणती जागा कोण लढणार याबाबत संभ्रम असतानाच सिटिंग खासदार या नियमानुसार जागा वाटपांचा प्राथमिक फॉम्युला आहे. त्यानुसारच सध्या तरी सर्व पक्षांकडून निवडणुकीचे काम सुरू असल्याचे दिसत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar
Loksabha Election 2024 : पालघर लोकसभेच्या रिंगणात 'या' संघटनेची एंट्री; समीकरणे बदलणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com