Nitin Gadkari News : नितीन गडकरी म्हणाले, मला आजकाल आमदार, खासदार भेटायला येत नाहीत

Nitin Gadkari Inauguration Roads :नगर-पुणे रस्त्याची खूप अडचण आहे. बांधकाम मंत्री असताना हा रस्ता बराच सुधारण्याचा प्रयत्न केला. याच काळात हा रस्ता पुष्कळदा सुधारला. पण या रस्त्यावर वाहतूक वाढली.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज नगर दौऱ्यावर होते. नगर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामांचे गडकरींच्या हस्ते लोकार्पण झाले. नितीन गडकरी यांनी या वेळी आज काल आमदार, खासदार मला भेटायला येत नसल्याचे सांगून त्यामागील कारणही जाहीरपणे सांगून टाकले. तसेच, यावेळी नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांच्या तीन कामांची घोषणाही केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते विळद बाह्यवळण, नगर-करमाळा रस्त्यांच्या कामाचे लोकार्पण झाले. खासदार सुजय विखे यांनी त्यांचे स्वागत केले. गडकरी म्हणाले, "मला आजकाल आमदार, खासदार पूर्वीसारखे भेटायला येत नाही. कारण, त्यांची कामेच संपली आहेत. नवीन राष्ट्रीय महामार्ग जाहीर करता येत नाही. जेवढे जाहीर केले आहेत, त्यावर चारपट कामे केली आहेत." नगर जिल्हा हा कृषी क्षेत्रातील व्यवसायावर अवलंबून असून त्याचा आलेख चढता आहे. त्यामुळे २०२४ संपले तेव्हा नगर जिल्ह्यातील (Nagar District) राष्ट्रीय महामार्ग हे अमेरिकेच्या रस्त्याबरोबरचे राहतील, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर जिल्ह्यात 12 हजार कोटींची कामे

नगर जिल्ह्याच सहकार, कृषी क्षेत्रामुळे चौफर विकास होत आहे. कृषी क्षेत्राचा दर उत्तम आहे. पण उद्योग आणि व्यापार क्षेत्रात विकास करायचा असेल, उत्तम रस्ते, दळणवळणाची साधने, कम्युनिकेशन, वीज या चार गोष्टींमुळे विकासाची गती वाढते. केंद्रात मी मंत्री झालो आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, त्यावेळी नगर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची लांबी २०२ किलोमीटर एवढी होती. पण २०१४ ते आजपर्यंत नव्याने ८६९ किलोमीटरपर्यंतचे राष्ट्रीय महामार्ग झाले. म्हणजेच चारपट रस्ते तयार केले. एकूण १ हजार ७१ किलोमीटरपर्यंतचे राष्ट्रीय महामार्ग (National Highway) तयार झाले आहेत. नगर जिल्ह्यात १२ हजार कोटी रुपयांपर्यंतची रस्त्याची कामे प्रस्ताविक केली होती. यात २१ कामे मंजूर करण्यात आली. त्यातील ११ कामे पूर्ण झाली. नऊ कामे प्रगतीपातळीवर आहेत. या कामांमुळे नगर जिल्ह्याचे चित्र बदलत असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

नगरमधील प्रगतीपथावरील कामे

नगर जिल्ह्यात प्रगतीपथावरील कामांची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. यात आढळगाव ते जामखेड हा ६३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ४०० कोटींचा ९० टक्के रस्ता पूर्ण झाला आहे. नगर-पाथर्डी १९ किलोमीटरचा ३६ कोटी रुपयांचे आहे. त्याची फेरनिविदा काढण्यात आली आहे. ते लवकरच पूर्ण करू. जामखेड ते सौताडा रस्त्याचे २० टक्के काम पूर्ण झाले आहे. कोपरगाव ते सावळी हा रस्ता प्रगतीपथावर आहे. तसेच नगर-दौंड रेल्वे मार्गावरील आररोबी आहे, १०० कोटीचे काम लवकरच सुरू होईल. नगर-निर्मळ (एनएच-८१) या रस्त्यावर सीना नदीवर पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. नगर ते खरवंडी कासार हे काम देखील निविदा प्रक्रियेत आहे. सावळीविहारपासून नगरपर्यंत आणि त्याचबरोबर नगर-दौंड-वासुंदे हा हजार कोटींचा रस्त्याचे काम लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याचे सांगितले.

शिरूर ते औरंगाबाद नवीन महामार्ग बांधणार

नगर-पुणे (Nagar-pune) रस्त्याची खूप अडचण आहे. बांधकाम मंत्री असताना हा रस्ता बराच सुधारण्याचा प्रयत्न केला. याच काळात हा रस्ता पुष्कळदा सुधारला. पण या रस्त्यावर वाहतूक वाढली. पुण्यातील रस्त्यावर उड्डाणपुलावर उड्डाणपुण आणि त्यावर मेट्रोचे, असे सुमारे ५० हजार कोटी रुपयांची उड्डाणपुलांची कामे प्रस्तावित केली आहेत. पुण शहरातील उड्डाणपूल हे शिरूरपर्यंत येणार आहेत.

Nitin Gadkari
Lok Sabha Election 2024 : ‘मी आता कुणाच्याच पंगतीला बसणार नाही; लोकसभेचे मैदान शेतकऱ्यांच्या जिवावर मारणार’

शिरूर ते औरंगाबाद हा नवीन महामार्ग बांधला जाणार आहे. त्याचा ले-आऊटही पक्का झाला आहे. हा रस्ता नगर शहराबाहेरून जाणार आहे. या रस्त्याचा दुष्काळ भागाला फायदा होणार आहे. यामुळे पुणे ते औरंगाबाद हे अंतर केवळ दोन तासाचे होईल. पुढे औरंगाबादहून समृद्धी महामार्गाने अडीच तासात नागपूरला जाणे होणार आहे. म्हणजे पुणे-नागपूर हे साडेचार तासाच्या प्रवासात येईल, अशी रस्त्याची कामे केली आहे. मुंबई-पुणे आणि मुंबई-नागपूर या रस्त्यांमुळे विकासकामांना गती मिळणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

आमदार प्रा. राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, प्रदेशचे प्रा. भानुदास बेरड आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ या वेळी उपस्थित होते.

Nitin Gadkari
Kolhapur Politics : क्षीरसागरांची घोषणा आणि आमदार जयश्री जाधवांकडून 'ते' पत्र व्हायरल!

नगर जिल्ह्यात नवीन कामांची घोषणा

माळशेज घाट-आणे घाट- नगर बायपास- खरवंडी कासार असे १६३ किलोमीटर लांबीच्या सिमेंट रस्त्यासाठी ४०० कोटी रुपये, नगर-सबलखेड-आष्टी-चिंचपूर या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ५० किलोमीटरचे काम ६७० कोटी रुपयांचे आहे. नांदूर-शिंगोटी-कोल्हार ४८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ३५० कोटी रुपयांच्या कामांची घोषणा गडकरी यांनी केली.

तर मी काही देऊ शकलो नसतो : खासदार विखे

खासदार डॉ. सुजय विखे यांनी मंत्री गडकरी यांचे विशेष आभार मानले. माझ्या खासदारकीच्या पाच वर्षांच्या काळात गडकरी रस्ते विकास मंत्री नसते, तर मी जिल्ह्याला काहीही देऊ शकलो नसतो, अशी कबुली त्यांनी दिली. गडकरी यांनी जिल्ह्यासाठी दिलेले योगदान पुढील चाळीस वर्षे जिल्ह्याची युवा पिढी विसरू शकणार नाही. या कामामुळे जिल्ह्याचे युवक भविष्याची उज्ज्वल स्वप्ने पाहत आहेत व भविष्यातही नगर जिल्ह्याचा अविरत विकास चालू राहील, असा विश्वासही खासदार विखे यांनी व्यक्त केला.

Nitin Gadkari
Loksabha Election 2024 : भाजपकडून आणखी एक माजी आयपीएस अधिकारी लोकसभेच्या रिंगणात; मतदारसंघही ठरला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com