
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी(ता.24) पुणे दौऱ्यावर होते. शरद पवार हे कात्रज येथील निंबाळकर वाडी परिसरात एका नियोजित कार्यक्रमाला जात असताना काही नागरिकांनी त्यांची गाडी अडवली. आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कानावर काही गोष्टी घालण्याची मागणी केली.
पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि परिसरातील जोडणी सुधारण्यासाठी राबवला जाणारा पुणे रिंग रोड प्रकल्प वेगाने प्रगतीपथावर आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दोन भागांत विभागला आहे: आंतरिक रिंग रोड (PMRDA) आणि बाह्य रिंग रोड (MSRDC). या प्रकल्पामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आजूबाजूच्या 83 गावांना जोडणारा 6 ते 8 लेनचा एक्सेस-कंट्रोल्ड महामार्ग तयार होणार आहे.
MSRDC ने डिसेंबर 2024 मध्ये बाह्य रिंग रोडचे काम सुरू केले असून, 70 ते 90% भूसंपादन पूर्ण झाले आहे. PMRDA च्या आंतरिक रिंगरोडसाठी फेज 1च्या 10 गावांमधील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पुण्यालगत असलेल्या गुजर निंबाळकर वाडी या भागातून देखील हा रिंगरोड जाणार असून यामुळे काही घर बाधित होत आहेत.
याच रहिवाशांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांची गाडी अडवत त्यांना निवेदन दिलं. यावेळी शरद पवारांशी बोलताना नागरिक म्हणाले, आम्ही कामानिमित्त महाराष्ट्राच्या विविध भागातून आणि बारामतीतून देखील या ठिकाणी येऊन दोन कोटीचे बंगले बांधले आहेत. असे या भागात 25 एक लोक आहेत. ज्यांची घरं बाधित होत आहेत. पूर्वी आम्हाला त्या ठिकाणावरून रस्ता जात नाही असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता आमच्या घराच्या जागेतूनच प्रस्तावित रिंग रोड जात आहे.
त्यामुळे तुम्ही या प्रकरणात लक्ष घालावे आणि प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घालावे अशी मागणी उपस्थित नागरिकांनी शरद पवार यांच्याकडे केली. तसेच आम्ही गरीब लोक असून आमची घर वाचवावी आणि हे फक्त तुम्हीच करू शकता असं साकडं या नागरिकांनी शरद पवार यांना घातलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.