Sharad Pawar News : इंदापूरमध्ये भाजप नेते, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी आज (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. शरद पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होत असताना आणखी काही नेते पक्षात येणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले.
शरद पवार म्हणाले, 'मी या कार्यक्रमासाठी येत होतो.निघायचा वेळेला फोन आला. त्यांनी हट्ट केला 14 तारखेला आमच्याकडं आलंच पाहिजे. मी म्हटलं काय कार्यक्रम आहे. तर ते म्हणाले जो इंदापूरला आहे तोच आमच्याकडे. मी विचारलं कुठं तर फलटणला.'
शरद पवारांनी रामराजे निंबाळकर यांचे नाव न घेता रामराजे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. आता एक महिन्यातील सर्वच दिवस बूक झाले आहेत. लोकांच्या मनात निर्णय झाला आहे, असे म्हणत शरद पवारांनी त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असल्याचे सूचित केले.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर रामराजे निंबाळकर यांनी अजित पवारांना साथ दिली होती. विधानसभेच्या आधी रामराजेंनी अजित पवारांची साथ सोडली तर त्यांच्या पक्षाला फलटण तालुक्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
शरद पवार म्हणाले, बळीराजाच्या हिताची जपणूक करणे हेच आमचे काम आहे. माझ्या सारख्याला वाटायचे हर्षवर्धन पाटील यांचा मार्ग चुकला आहे. भाऊंनी एकच विचार घेतला गांधी, नेहरूंचा. हर्षवर्धन पाटील तेथे गेले पण त्यांचे मन इकडे होते. त्यांना निर्णय घ्यायला उशीर झाला पण निर्णय घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. 'विधानसभेला इंदापूरचा महाधनुष्य हर्षवर्धनभाऊ हाती घ्यावा. अशी उमेदवारी जाहीर करता येत नाही. पण तुम्ही इंदापूरकर हुशार आहात.मी वाळव्यावरून येथे तु्म्हाला येऊन सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राला मार्गदर्शन करणाऱ्या नेत्यांच्यी गरज त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे महत्त्व आमच्या पक्षात आहे', असे जयंत पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.