Pawar Vs Pawar : अजितदादांविरोधात युगेंद्र पवारांची पुन्हा तयारी सुरू; माळेगाव कारखान्यात भिडणार!

Baramati News : अजित पवार यांची सत्ता असलेला बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची लवकरच निवडणूक होणार आहे. हीच निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तयार केली आहे.
Ajit Pawar, Yugendra Pawar
Ajit Pawar, Yugendra PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बारामतीमधील पवार विरुद्ध पवार हा सामाना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. यातील लोकसभेचा सामना सुप्रिया सुळे यांच्या रूपाने शरद पवार यांनी जिंकला. तर विधानसभा निवडणुकीत आपणच बारामतीचे दादा असल्याचे अजितदादांनी दाखवून दिले. यानंतर बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांची सत्ता असलेला बारामती (Baramati) तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची लवकरच निवडणूक होणार आहे. हीच निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तयार केली आहे. या तयारीची जबाबदारी स्वतः युवा नेते युगेंद्र पवार यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ते ही निवडणूक लढणार की नाही, याबाबत शरद पवार यांच्या सूचनेनुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar, Yugendra Pawar
MLA Suresh Dhas News : माझ्या पत्रामुळेच उज्वल निकम यांची नियुक्ती, आता आरोपी फासावर जाणारच!

माळेगाव कारखाना म्हणजे अजित पवार यांचे राजकीय संस्थानचं!

माळेगाव आणि सोमेश्वर हे सहकारी तर अंबालिका आणि दौंड शुगर्स हे दोन खाजगी कारखाने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नियंत्रणात आहेत. हे साखर कारखाने म्हणजे त्यांची राजकीय संस्थांनचं. आज घडीला हे चारही कारखाने उत्तम स्थितीमध्ये आहेत. साखर उतारा, इथेनॉलपासून निर्मिती, गाळप क्षमतेचा वापर अशा विविध कार्यक्षमतेवर हे कारखाने राज्यात अग्रगण्य ठरले आहेत.

Ajit Pawar, Yugendra Pawar
Ravikant Tupkar : तुपकरांची शेतकरी संघटना आता स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रस्थापितांना घाम फोडणार!

यातील माळेगाव हा कारखाना सहकारातील तज्ञ आणि भाजपचे माजी नेते चंद्रराव तावरे, कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन काका तावरे यांच्या हातातून अजित पवार यांनी हा कारखाना घेतला होता. आज घडीला माळेगाव कारखान्याचे 19 हजार 549 सभासद आहेत. बारामती तालुक्याच्या राजकारणात या कारखान्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळेच या कारखान्याची निवडणूक ताकदीने लढवण्याच्या तयारीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com