Ravikant Tupkar : तुपकरांची शेतकरी संघटना आता स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रस्थापितांना घाम फोडणार!

Tupkar Farmers Union News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून राजू शेट्टी यांनी हकालपट्टी केली. आता तुपकरांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News : लोकसभेच्या निवडणुकीत बुलढाणा मतदरसंघात शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नरेंद्र खेडकर यांना चांगलाच घाम फोडला होता. तुपकर यांनी तब्बल अडीच लाख मते घेतली होती. याच कारणामुळे त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून राजू शेट्टी यांनी हकालपट्टी केली. आता तुपकरांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना करून सर्वच प्रस्थापित नेते आणि पक्षांना आव्हान देण्याचा निर्धार केला आहे.

क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या बैठकीत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून रविकांत तुपकरांना (Ravikant Tupkar) शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. ही संघटनेची जमेची बाजू आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत संघटना उलाथापालथ करण्याची भीती आतापासूनच अनेकांना सतावू लागली आहे.

Ravikant Tupkar
kirit Somaiya News : किरीट सोमय्या सिल्लोडमधील साडेचार हजार बांगलादेशींची यादी एटीएसला देणार!

एकेकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांचे तुपकर हे कट्टर समर्थक होते. लोकसभेची निवडणूक लढल्याने त्यांना शेतकरी संघटनेतून काढून टाकण्यात आले आहे. आता त्यांनी बिगर राजकीय क्रांतिकारी शेतकरी संघटना स्थापना केली आहे, असे असले तरी प्रस्थापित राजकीय राजवाडे उद्ध्वस्त करण्यासाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवणुकीसाठी आजपासून कामाला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Ravikant Tupkar
Ncp News : फूट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार, अजितदादांसह दोन्ही 'राष्ट्रवादी'चे सर्व नेतेमंडळी एकत्रित येणार उद्या एका मंचावर

आपली संघटना अराजकीय असली तरी शेतकऱ्यांच्या मुलांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात जावे, शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस लावावे याकरिता आम्ही तयारी करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात शेतकरी चळवळी आता क्षीण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी क्रांतीकारी शेतकरी संघटना पुढाकार घेणार आहे. शेतकऱ्यांच्या चळवळी टिकल्या पाहिजे, यासाठी काळानुसार बदलणे आवश्यक असल्याचे तुपकरांचे म्हणणे आहे.

Ravikant Tupkar
Sharad Pawar : फडणवीसांनंतर शरद पवारांकडूनही नीलम गोऱ्हेंची कानउघडणी; म्हणाले, 'ते' वक्तव्य टाळायला हवं होते...

स्वाभिमानीनेच मला काढले

लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कमेटीने हजर होण्याचे आदेश मला दिले होते. ज्याने कधी आंदोलन केले नाही, आंदोलनाचा एकही गुन्हा ज्याच्यावर नाही आणि सुटीच्या दिवशी काम करणाऱ्या समितीच्या अध्यक्षसमोर हजर होण्यास मी नकार दिला. मी काही दरोडा टाकला नाही आणि बलात्कारही केला नाही. मात्र समितीच्यावतीने एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे मला हजर होण्याचे आदेश दिले. मी हजर झालो नाही म्हणून संघटनेतून काढून टाकले. त्यामुळेच आपल्याला क्रांतीकारी शेतकरी संघटनेची स्थापना करावी लागली असे रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले.

Ravikant Tupkar
Vishal Patil : वसंतदादांच्या वारसांनी कारखाना राखला! निवडणूक बिनविरोध; आता दादांची चौथी पिढीही राजकारणात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com