Pune News : महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक मुरब्बी नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. पक्षफुटीनंतरही मागील काही दिवसांपासून शरद पवार यांनी बेरेजेच्या राजकारणावर लक्ष केंद्रीत केले आहे. अलीकडे त्यांच्या पक्षात अनेक मोठ्या नेत्यांनी प्रवेश करत पुन्हा एकदा ताकद दाखवली आहे. पक्षप्रवेशाच्या या मालिकेमध्ये आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांचीही शरद पवार गटाला साथ मिळण्याची शक्यता आहे. अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर (Bhushan Singh Holkar) हे शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भूषण सिंह होळकर हे शरद पवार गटात प्रवेश करुन मोठी जबाबदारी घेण्याच्या इराद्यात असल्याचे दिसते. भूषण सिंह होळकर हे शरद पवार गटाचे स्टार प्रचारक असतील असे बोलले जात आहे. एवढेच नाही तर भूषणसिंह होळकर हे शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदीही त्यांची निवड होण्याची शक्यता आहे. यामुळे आता शरद पवार गटाची स्थानिक ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. (Lok Sabha ELection 2024)
साधरण तीन एक वर्षांपूर्वी भूषणसिंह होळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. मागील काही दिवसांत जेजुरी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्यामुळे काहींनी विरोध केला होता. हा वाद चांगलाच गाजला होता. याचवेळी भूषणसिंह यांनीच पवारांवर टीका करताना होळकरांच्या सातबाऱ्यावर पवारांचा डोळा असल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र हेच भूषणसिंह होळकर आता शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
माढा लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात भाजपने खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा संधी दिली. त्यामुळे पुतणे धैर्यशील मोहिते पाटलांसाठी आग्रही असलेले भाजपनेते विजयसिंह मोहिते पाटील नाराज होते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी जयंत पाटलांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांच्या रुपाने पक्षाचा दहावा उमेदवारही जाहीर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.