Pawar PC In Akluj : मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा संदेश राज्यभरात जाईल; शरद पवारांचे सूचक विधान

Solapur, Madha Loksabha Election 2024 : मोहिते पाटील यांच्या निर्णयामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढवणारा संदेश राज्यात जाईल. त्याचा उपयोग आम्हाला निश्तिच होईल आणि लोक आम्हाला स्वीकारतील. आजच्या अकलूजमधील बैठकीचा राज्यभर निश्चितपणे संदेश जाईल.
Sharad Pawar-Dhairyasheel-Vijayshinh Mohite Patil
Sharad Pawar-Dhairyasheel-Vijayshinh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Akluj, 14 April : धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहिते पाटील यांच्या निर्णयाचा संदेश हा एका मतदारसंघापुरता सिमित राहणार नाही, तर तो राज्यभरात जाईल. त्यातून मागील लोकसभा निवडणुकीतील चित्र या वेळी बदलेले दिसेल, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटील (Mohite Patil) यांनी स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. त्या भोजनाला शरद पवार (Sharad Pawar), माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijayshinh Mohite Patil), शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil), माजी आमदार नारायण पाटील, धनाजी साठे याशिवाय माण खटाव, फलटण, सांगोला, माळशिरस, करमाळा आणि माढ्यातील महत्वाचे नेते उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी राज्याती चित्र या वेळी बदलण्याबाबत भाष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar-Dhairyasheel-Vijayshinh Mohite Patil
Sule Attack On Govt : गोळीबार सरकारच्या नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

शरद पवार म्हणाले, मोहिते पाटील यांच्या निर्णयामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढवणारा संदेश राज्यात जाईल. त्याचा उपयोग आम्हाला निश्तिच होईल आणि लोक आम्हाला स्वीकारतील. आजच्या अकलूजमधील बैठकीचा राज्यभर निश्चितपणे संदेश जाईल. मागील निवडणुकीत आम्हाला अत्यंत कमी जागा मिळाल्या होत्या. ते चित्र या निवडणुकीत निश्चितपणे बदलेले दिसेल.

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात आम्ही लोकांनी आमच्या सहकार्यांना आढावा घेतला. सुशीलकुमार शिंदे, आमचे सहकारी विजयसिंह मोहिते पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, तसेच मतदारसंघातील महत्वाचे नेते आज उपस्थित आहेत. उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वकाही करण्याची तयारी आमच्या सहकाऱ्यांनी ठेवली आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar-Dhairyasheel-Vijayshinh Mohite Patil
Solapur Politics : पवार-शिंदे, मोहिते पाटलांमध्ये ‘शिवरत्न’वर खलबतं; धनाजी साठे, नारायण पाटलांचीही हजेरी

पवार म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी लढावी, अशी आमची इच्छा होती. त्यासाठी त्यांना पक्षात प्रवेश करण्याची सूचना केली आहे. आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हेाईल.

सोलापूर हा गांधी, नेहरूंचा विचार जपणारा आहे. त्यामुळे आमचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील. माण खटाव, फलटण, सांगोला, माळशिरस, करमाळा आणि माढ्यातील महत्वाचे नेते आज उपस्थित आहेत. त्यातून त्यांनी निवडणुकीत यश देण्याची भूमिका घेतली आहे. तसेच, भाजपने शेतीमालाच्या किमतीबाबत दिलेले आश्वासन पाळलं नाही. त्यांनी अनेक आश्वासने पाळलेली नाहीत, असेही पवारांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar-Dhairyasheel-Vijayshinh Mohite Patil
Mohite Patil's Dinner Diplomacy : मोहिते पाटलांची पवार, शिंदेंसोबत 'डिनर डिप्लोमसी'; सोलापूर, माढ्याची रणनीती ‘शिवरत्न’वर ठरणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com