Sharad Pawar News : 'शेवटची निवडणूक म्हणून भावनिक..' अजितदादांच्या वक्तव्याला पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले...

Sharad Pawar On Ajit Pawar : "बारामतीकर शहाणे आणि समजदार आहेत योग्य निर्णय घेतील..."
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune news : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर सर्वाधिक चर्चा ही बारामती मतदारसंघातील लोकसभेच्या जागेवरील होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी बारामतीमधून काही लोक शेवटची निवडणूक आहे, असे म्हणून भावनिक आवाहन करतील, असं वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता त्याला उत्तर दिले आहे. (Sharad Pawar On Ajit Pawar)

Sharad Pawar News
Ajit Pawar Ncp : अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिली 'ही' शपथ; म्हणाले, "सार्वजनिक जीवनात..."

पुण्यामध्ये डॉक्टर सेलच्या मेळाव्याला शरद पवारांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले, "पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला, याचा अर्थ स्पष्ट आहे. आजचे राज्यकर्ते हे झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ इच्छितात. मात्र ही झुंडशाही लोकांना कदापि पटणार नाही. सरकार त्यांचं आहे आणि पोलिस दल त्यांच्या हातात आहे. याचा गैरफायदा घेण्याचा प्रकार घडताना दिसत आहे. त्यामुळे पुण्याचा आणि महाराष्ट्राचा नागरिक हा सुज्ञ असून, अशा प्रवृत्तीला त्याची जागा दाखवल्याशिवाय तो राहणार नाही. ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं, त्या पक्षाच्या राज्य आणि देश पातळीच्या नेत्यांनी गंभीर दखल घेण्याची आवश्यकता होती. ती घेतली नाही, ही चिंताजनक बाब असल्याचे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar News
Ajit Pawar Ncp : अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिली 'ही' शपथ; म्हणाले, "सार्वजनिक जीवनात..."

निवडणूक आयोगाच्या निकालावर बोलताना शरद पवार म्हणाले, "आयोगाने दिलेला निकाल हा आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगाने फक्त आमचं चिन्हच काढून घेतलं नाही तर आमचा पक्ष दुसऱ्याला देऊन टाकला आहे. ज्यांनी हा पक्ष स्थापन केला, ज्यांनी पक्षाची उभारणी केली. त्याच्या हातातून पक्ष काढून दुसऱ्याला देण्यासारखी घटना यापूर्वी या देशात कधी झाली नव्हती. ते निवडणूक आयोगाने करून दाखवले आहे. लोक अशा गोष्टींना समर्थन देणार नाहीत. सुप्रीम कोर्टात आम्ही गेलो आहोत, तिथे आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस 'वटवृक्ष' या चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे का? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले, "अद्याप चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. निवडणूक आयोगाने चिन्ह कळवण्याबाबत आम्हाला पत्र पाठवले आहे. आम्ही सोमवार किंवा मंगळवारी त्यांची वेळ घेऊ आणि प्रस्ताव देऊ." तत्पूर्वी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून चिन्हाबाबत निर्णय घेणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

बारामतीमध्ये अजित पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी काही लोक भावनिक आवाहन करतील, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, मी यापूर्वीच निवडणूक लढणार नाही याबाबत जाहीर केले आहे. त्यामुळे मी भावनिक आवाहन करण्याची आवश्यकता नाही. तरी बारामतीतील लोक शहाणे आणि समजदार आहेत. वर्षानुवर्ष त्यांची कामे कोणी केले, त्यांची प्रतिष्ठा कोणी वाढवली आहे, हे ते जाणतात. त्यामुळे बारामतीकर योग्य निर्णय घ्यायला समर्थ असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, "लोकशाही असल्यामुळे कोणालाही निवडणूक लढवण्याचा हक्क आहे. त्यामुळे कोणीही आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असं शरद पवार म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com