अजितदादांच्या उपस्थितीत होणाऱ्या 'सारथी'च्या बैठकीला शरद पवारांची अचानक हजेरी

बैठकीत पूर्णवेळ थांबून त्यांनी सारथीची इमारत व इतर बाबींविषयी माहिती जाणून घेतली.
Sharad Pawar and Ajit pawar
Sharad Pawar and Ajit pawar
Published on
Updated on

पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) नवीन इमारतीचे सादरीकरण व इतर महत्वाच्या मुद्यांवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्य उपस्थितीत बैठकीचे नियोजन होते. पण विधान भवन येथे होणाऱ्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक हजेरी लावली. या बैठकीत पूर्णवेळ थांबून त्यांनी सारथीची इमारत व इतर बाबींविषयी माहिती जाणून घेतली.

सारथी संस्थेला हक्काची जागा मिळाली आहे. जागेचा प्रश्न मिटला असून संस्थेला शिवाजीनगर येथील गट क्रमांक 1737/1 मधील 4163 चौरस मीटर एवढी शासकीय जागा मिळाली आहे. या जागेवर संस्थेसाठी कार्यालय उभारले जाणार आहे. या प्रस्तावित इमारतीचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले.

Sharad Pawar and Ajit pawar
असाही संघर्ष : वयाच्या पाचव्या वर्षी अनाथ झालेला नारायण बनला साहेब!

बैठकीला अजित पवार, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, संचालक मधुकर कोकाटे, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आदी उपस्थित होते. शरद पवार यांनी या बैठकीबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या बैठकीत ‘सारथी’ संस्थेच्या नवीन इमारतीविषयक सादरीकरण व इतर माहिती जाणून घेतली,' असं पवारांनी म्हटलं आहे.

राज्य शासनाने सारथी संस्थेला शिवाजीनगर, भांबुर्डा येथील शासकीय जागा कार्यालय बांधण्यासाठी प्रदान केली आहे. यामुळे आता सारथी संस्थेला हक्काची जागा उपलब्ध होणार आहे, असं पवार यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. शरद पवार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना आवश्यक सुचनाही केल्या.

सारथी संस्थेसंबंधित इतर प्रलंबित विषय त्वरीत मार्गी लावून तळागाळातील मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी समुदायातील समाजासाठी सारथी संस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, अशी सूचना बैठकीत केल्याची माहितीही शरद पवार यांनी ट्विटमध्ये दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com