पाबळमध्ये पोचताच पवारांनी काढली बापूसाहेब थिटेंची आठवण!

शेतीतील नवीन प्रयोग व सद्यस्थितीतील पीकपाण्याबाबतही त्यांनी माहिती घेतली.
sharad pawar

sharad pawar

sarkarnama

Published on
Updated on

शिरूर (जि. पुणे) : इथला दुष्काळ संपला की नाही... शेतशिवारात नवीन काय... बागायती केली मग पाणी पूरतं का...अवकाळी पावसामुळं काय नुकसान झालं... थिटेवाडीचं काय, डिंभ्याचं पाणी मिळतं का... काळ्या मातीवर प्रेम आणि शेतकरी बांधवांविषयी कमालीची आस्था बाळगणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) रस्त्याने जाता-जाता गाड्यांचा ताफा थांबवून रस्त्याकडेला थांबलेल्या शेतकऱ्यांना आवर्जून भेटत होते. तसेच, आस्थेने त्यांची व शेतीची विचारपूस करीत होते. (Sharad Pawar took information about agriculture in Shirur)

शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या पवारांनी शेती आणि शेतकऱ्यांविषयी दाखविलेल्या उत्कट प्रेमाची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून तालुक्याच्या राजकीय-सामाजिक पटलावर चर्चिली जात आहे. खेडहून पाबळमार्गे पवार टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी मोटारीतून आले होते. त्यावेळी पाबळ, खैरेनगर, मलठण, आमदाबाद फाटा येथे रस्त्याच्या कडेला त्यांच्या स्वागतासाठी थांबलेल्या पदाधिकाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या स्वागताचा त्यांनी वाहने थांबवून नम्रपणे स्वीकार केला.

sharad pawar

राज्यपालांचे म्हणणे काहीही असो विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी होणारच!

पाबळ येथे जिल्हा परिषद सदस्या सविता पऱ्हाड, मलठण येथे सरपंच शशिकला फुलसुंदर, खैरेनगर येथे माजी सरपंच रघुनाथ शिंदे, आमदाबाद फाट्यावर माजी सरपंच प्रकाश थोरात व योगेश थोरात यांनी स्थानिक शेतकऱ्यांसह त्यांचे स्वागत केले. तेव्हा दोन्ही हात जोडत पवारांनीही त्यांच्याबाबत ख्याली-खुशाली विचारली. पाबळमध्ये बापूसाहेब थिटे व मलठणमध्ये बाळासाहेब गिते या आपल्या जुन्या सहकाऱ्यांची त्यांनी आवर्जून आठवण काढली. तत्कालीन काही सहकाऱ्यांची थेट नावे घेत त्यांच्याबाबत चौकशी केली. शेतीतील नवीन प्रयोग व सद्यस्थितीतील पीकपाण्याबाबतही त्यांनी माहिती घेतली.

sharad pawar

शिवसेनेने रुईकर कुटुंबाची जबादारी घेताच पाच लाखांची मदत पोहचली

खैरेनगर येथे मच्छिंद्र शिंदे हे कुटुंबीयांसह रस्त्याकडेला थांबले होते. पवारांचा ताफा या रस्त्याने जात असताना उपस्थितांनी नमस्कारासाठी हात जोडले असता पवारांनी ताफा थांबविला. तेव्हा शिंदे यांनी 'साहेब कांद्याच्या भावाचं तेवढं बघा', असे म्हणताच स्मितहास्य करीत पाहतो, अशा शब्दांत त्यांनी दिलासा दिला. रघुनाथ शिंदे यांच्याकडे कटाक्ष टाकीत खूणेनेच ख्याली-खुशाली विचारली. शेजारीच द्राक्ष बाग दिसताच, द्राक्षाचे अवकाळीमुळे काही नुकसान झाले का, अशी विचारणाही त्यांच्याकडे केली. पाण्याचा काय सोअर्स आहे, सेंद्रीय शेतीचे प्रयोग कुणी करता का, याचीही त्यांनी आवर्जून माहिती घेतली.

sharad pawar

आमदाराच्या प्लाॅटवर गुंडांचा ताबा आणि पोलिस म्हणतात, असे अनेक आमदार पाहिलेत!

शरद पवार साहेबांचे शेतकरी प्रेम व काळ्या मातीविषयीचा जिव्हाळा सर्वश्रूत आहे. त्याचीच प्रचिती आम्हाला आली. आम्ही कुटुंबीय या जाणत्या राजाला पाहण्यासाठी व केवळ हात उंचावून नमस्कार करण्यासाठी थांबलो होतो. मात्र, आम्हाला पाहून त्यांनी मोटारींचा ताफा थांबविला. आमची विचारपूस करताना शेतशिवाराची आस्थेने चौकशी केली. शेती करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतू पवार साहेबांसारखा शेतीची जाण असलेला नेता पहाडासारखा पाठीशी असल्याने या समस्यांचे काहीच वाटत नाही. शेती आणि शेतकरी समाजाविषयी बांधिलकी बाळगणारा एवढा मोठा नेता आमच्यासाठी थांबला, मोटारीच्या काचा खाली करून संवाद साधला याचेच अप्रूप वाटते, असे खैरेनगरचे माजी सरपंच रघुनाथ शिंदे यांनी सांगितले.

sharad pawar

राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षाने स्वखर्चाने बसविले सी.सी.टीव्ही कॅमेरे

आम्ही पवार साहेबांच्या स्वागतासाठी व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलो होतो. आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी ते थांबले अन् आमचीच विचारपूस केली. शेतीविषयक माहिती जाणून घेताना (स्व.) बापूसाहेब थिटे यांच्यासह जुन्या काही सहकाऱ्यांची त्यांनी आवर्जून आठवण काढली, अशी माहिती पुणे जिल्हा परिषद सदस्या सविता पऱ्हाड यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com