Sharad Pawar Video : आघाडीतील मैत्रीपूर्ण लढतींवर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले...

Sharad Pawar on Maharashtra Election : काही ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार एकाच वेळी निवडणूक रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळत आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होत आहे. असं असताना देखील काही ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार एकाच वेळी निवडणूक रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

मित्र पक्षाचा उमेदवार असताना देखील पक्षाने उमेदवार दिल्याने या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभरात कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असं स्पष्ट केला आहे.

बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, कुटुंबातील लोक नोकरी उद्योगधंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी जातात. दिवाळीच्या निमित्ताने हे सगळे लोक आपल्या मूळ गावी येतात आणि कुटुंबातील सुखदुःख बाबत एकमेकांशी संवाद साधतात. दिवाळीच्या निमित्ताने कुटुंबाला एकत्र येण्याची ही एक उत्तम संधी असते.

या दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लोक उत्तम वातावरण तयार करतील. त्यामुळे सर्वांची दिवाळी सुख आणि समाधानी जाईल. ही दिवाळी महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी सुखा समृद्धीचे आणि समाधानाची जावी त्यांचा आत्मविश्वास वाढावा एवढ्या माझ्या दिवाळीच्या निमित्ताने सदिच्छा असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले.

Sharad Pawar
Purandar Assembly Election: विधानसभेसाठी अजितदादांनी लोकसभेचा तह मोडला? महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार

आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये तेढ निर्माण झाली असून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, जागा वाटपाच्या प्रक्रियेमध्ये मी नाही आमची दुसरी लोकं त्या प्रक्रियेमध्ये आहेत.

मात्र सध्याची परिस्थिती पाहिल्यास राज्यातील दहा ते बारा जागांवर दोन उमेदवार दिले असल्याचा पाहायला मिळत आहे. आज उद्या दोन दिवसांमध्ये या जागांवर सर्व मित्र पक्षातील नेते बसतील आणि तोडगा निघेल असा मला विश्वास असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

Sharad Pawar
Kothrud Assembly : कोथरूडमध्ये हायव्होल्टेज लढत; 'मविआ'चा प्रचार सुरू

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व नेते महाराष्ट्रातील जनतेला कार्यक्रम दिशा देऊन जनता पाठीशी उभी राहील या दृष्टिकोनातून वातावरण निर्मिती करतील. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी सहा तारखेपासून मोहीम सुरू होईल यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी मी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही प्रचाराची मोहीम सुरू होईल. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातील जनता आम्हाला साथ देईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com