Sharad Pawar Breaking News : शरद पवारांची मोठी मागणी, म्हणाले,'' आम्ही महिलांना महानगरपालिकेपर्यंतच आरक्षण देऊ शकलो, पण आता...''

NCP Political News : ...तर मोदींच्या या धोरणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठिंबा देईल !
Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar, Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Pune : महाराष्ट्रात मी मुख्यमंत्री असताना महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले होते. त्यात जिल्हा परिषद,नगर पंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या संस्थांमध्ये आरक्षण दिलं. आणि त्याचा परिणाम अनेक संस्थांमध्ये महिलावर्ग चांगलं काम करत आहेत. आता हा आमचा अनुभव बघितल्यावर त्याचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेतला गेला, त्याचं आम्ही स्वागत केलं. आम्ही महिलांना फक्त महापालिकेपर्यंतच आरक्षण देऊ शकलो. पण आता विधीमंडळ आणि संसद या दोन्ही ठिकाणी महिलांना आरक्षण द्यायला हवं अशी मोठी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवार(Sharad Pawar) यांनी पुण्यात गुरुवारी (दि.२९) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केलं. पवार म्हणाले, विधीमंडळ आणि संसदेत महिलांना आरक्षण द्यायला पाहिजे. आणि यात जर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढाकार घेणार असतील तर आमचं संसंदेतलं संख्या मर्यादित आहे. तरी मोदींच्या या धोरणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठिंबा देईल असंही पवार यांनी यावेळी सांगितलं.

Sharad Pawar, Narendra Modi
Devendra Fadnavis On Morning Oath : पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या बैठकीनंतरच ! फडणवीसांचा खळबळजनक दावा

याचवेळी त्यांनी महिलांना विधीमंडळ आणि संसदेत आरक्षण देण्याबाबत जे काही विरोधी पक्ष आहे, त्यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केलेली नाही. पण त्यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे. आणि ते यात कसे सहभागी होतील हे पाहू असेही पवार यांनी सांगितलं.

पवार यांनी यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राज्यात गेल्या सहा महिन्यात 2,458 मुली बेपत्ता आहेत आणि ही चिंतेची बाब असल्याचं शरद पवार म्हणाले. 14 जिल्ह्यातून एकून 4,434 मुली बेपत्ता असल्याची माहिती दिली. मागील एक वर्षाच्या काळात एकंदरीत ६ हजार ८८९ मुली व महिला बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे या बाकीच्या मुद्द्यांवर भाष्य करण्य़ापेक्षा राज्याच्या गृहमंत्र्यांनी बेपत्ता मुली वा महिला यांचा शोध कसा लागेल, महिला आणि मुलींवरील हल्ले कसे थांबतील, याकडे लक्ष दिले पाहिजे असा टोला फडणवीसांना लगावला.

Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar on uniform civil code : समान नागरी कायदाच्या समर्थनावर पवार म्हणाले, "सर्व समुदायांची भूमिका समजून घेतल्यानंतर...

समान नागरी कायद्यावर पवार काय म्हणाले...

शरद पवार यांनी समान नागरी कायद्या( Uniform Civil Code) वर भाष्य केलं. ते म्हणाले, एकाच देशात दोन कायदे नको असं पंतप्रधानांनी म्हटल्याची माहिती आहे. त्यावर समान नागरी कायदा लागू करण्याचा विचार सुरू आहे. शिख समाज, जैन आणि इतर समाजांची भूमिका काय आहे हे स्पष्ट व्हावं. शिख समाजाचं वेगळं मत असल्याचं माझ्या कानावर आलं आहे.

समान नागरी कायद्याला विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतल्याची माहिती आहे. कायदा आयोगाने सांगितल्याप्रमाणे सर्वांचं मत लक्षात घेऊन यावर निर्णय घ्यावं. तसेच समान नागरी कायदा लागू करण्याची बातमी सगळीकडे पसरवली जातेय, हे कुठल्यातरी महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष विचलित करण्यासाठी केलं जातंय का हे पाहावं लागेल असंही पवार यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com