Lonavala : गेल्या काही दिवसांत राज्यात छत्रपती संभाजीनगर, अकोला, शेवगाव, कोल्हापूर, समनापूर अशा विविध ठिकाणी दंगलीच्या घटना घडल्या होत्या. यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं. विरोधकांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरुन शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची तोफ डागण्यात येत आहे. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर खळबळजनक आरोप केला आहे.
शरद पवार(Sharad Pawar) यांनी लोणावळा येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील घडलेल्या दंगलीच्या घटनांवर भाष्य केलं. पवार म्हणाले, सध्या धर्म, जातीच्या नावाने समाजात संघर्ष निर्माण केला जात आहे. या प्रवृत्तीमागे सत्ताधाऱ्यांची शक्ती आहे. या गोष्टी देशाच्या बाबतीत गंभीर आहेत असं विधान करतानाच राजकीयांनी संघटित राहायला हवं असंही पवार म्हणाले.
गेल्या काही दिवसांत किती जातीय दंगली होतायेत. हा देश, हा समाज सर्वांना घेऊन जाणारा आहे. मात्र सध्या दहशतीचे वातावरण निर्माण केली जातीये. ही कामाची पद्धत सध्या दिसून येतंय अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केली.
देशात 70 टक्के ठिकाणी भाजप सत्तेबाहेर....
आता देशातील चित्र बदलत आहे. कर्नाटकमध्ये तुम्ही पाहिलेलं आहेच. कोणी काहीही सांगत असलं तरी आता चित्र बदलतंय. त्यांच्यामागे मोठी शक्ती आहे. मात्र तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, हिमाचल प्रदेश अशा 70 टक्के ठिकाणी भाजप(BJP) सत्तेबाहेर आहे.
गोवा, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये वेगळं चित्र आहे. इथं कसली तरी खोकी देऊन फोडाफोडी केली. मात्र आता देशाचा कारभार कोणी चालवावा याबाबत निर्णय घेताना प्रादेशिक पक्षच हे ठरवतील, यात कोणती शंका नाही असंही पवार यांनी यावेळी सांगितले.
देशाच्या दृष्टीने हे चित्र वाईट
आजचा काळ चमत्कारिक आहे. मला आज मणिपूरच्या सहकाऱ्याचा फोन आला. ते म्हणाले, आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही? यावर मी म्हटलं असं टोकाचं का बोलताय. ते म्हणाले इथं लोक, अधिकारी, शैक्षणिक संस्थांवर हल्ले होतायेत. हे राज्य पेटलंय पण इथं कोणी लक्ष देत नाहीत. रोज घरंदारं उद्धवस्त होताहेत.
केंद्र सरकार याकडे लक्षही देईना. पंतप्रधान(PM Narendra Modi) असो की केंद्रीय मंत्री असोत आमच्या प्रश्नांकडे ढुंकुनही पाहत नाहीत. त्यामुळं आम्ही भारताचे नागरिक आहोत की नाही अशी भीती ते व्यक्त करतायेत. देशाच्या दृष्टीने हे चित्र वाईट असल्याचं निवृत्त लष्करी अधिकारी सांगतायत. ही स्थिती असताना राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करतात, हे खेदजनक आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.