Manisha Kayande Join Shinde Group: ठाकरे गटाला सोडचिठ्ठी का दिली? मनिषा कायंदेंनी सांगितलं कारण...

Shivsena Political News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनिषा कायंदे यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी!
Manisha Kayande Join Shivsena
Manisha Kayande Join ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी अखेर शिवसेनेत (शिंदे गट) अधिकृत प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनिषा कायंदे यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला. पक्ष प्रवेशानंतर लगेचच मनिषा कायंदे यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. सकाळपासून त्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या सर्व घाडामोडींवर मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, शिवसेनेत प्रवेश करताच त्यांनी आपण शिवसेनेत का प्रवेश केला? याचं कारण सांगत ठाकरे गटावर घणाघाती टीका केली.

Manisha Kayande Join Shivsena
Manisha Kayande Join Shivsena: मोठी बातमी! मनिषा कायंदेंचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना धक्का!

मनिषा कायंदे म्हणाल्या, "आपण यापुढे शिवसेनेत काम करत राहणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला खऱ्या शिवसेनेत प्रवेश दिला. खरी शिवसेना हीच आहे. यामध्ये मी आज प्रवेश केला असून यापुढेही काम करत राहणार आहे. मी याआधीही प्रामाणिकपणाने काम केलं. मी कुठेही पक्षविरोधी काम केलेलं नाही", असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

"शिंदे-फडणवीस सरकारने एक वर्ष पूर्ण केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या कामातून उत्तर दिलं आहे. ते राज्यात झपाट्याने काम करत आहेत. आपल्याला थुकरटवाडी असणारे लोक येथे नको. देवीचा अपमान करणारे लोक नकोत. पक्ष प्रमुखांशी बोलताना अडचण येत असेल तर ती गद्दार वाटते. पण बाळासाहेबांची खरी शिवसेना इथं आहे त्यामुळे मी येथे आले", असं सांगत मनिषा कायंदे यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

Manisha Kayande Join Shivsena
Manisha Kayande: मनिषा कायंदेंच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवर ठाकरे गट सावध; केली मोठी कारवाई

दरम्यान, "पक्षातील लोकं का सोडून जात आहेत, याचे आत्मपरीक्षण न करता सकाळी उठून खिल्ली उडवणारे लोकं आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी पक्षातील लोकं का सोडून जात आहेत, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे", असा सल्लाही त्यांनी यावेळी ठाकरेंना दिला.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com