Pune Political News : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 2024-25 या आर्थिक वर्षाचे बजेट येत्या मंगळवारी (ता. 20) सादर होणार आहे. फक्त सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने ते आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांना सादर केले जाईल. एरव्ही ते आयुक्त स्थायी समितीला सादर करतात. (PCMC)
प्रशासकीय राजवटीतले हे दुसरे बजेट आहे. ते महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सादर करतील.गतवेळी ते शिलकी आणि करमुक्त होते. त्याअगोदरच्या वर्षातही (2023-23) महापालिका (Corporation) निवडणूक होण्याची शक्यता गृहित धरुन कसलीही दरवाढ आणि करवाढ न करता ते सादर करण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी ते तसेच असेल, तर तशा बजेटची ही हॅटट्रिक होईल. फक्त ते शिलकी असेल की नाही, एवढीच चिंता सतावते आहे. कारण पालिकेने दोनशे कोटी रुपयांचे कर्जरोखे नुकतेच घेतले असून आणखी पाचशे कोटींचे कर्ज घेण्याच्या विचारात ती आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महापालिकेचे हे 42 वे बजेट आहे. राजेश पाटील यांच्या बदलीनंतर आपल्या कारकिर्दीत प्रथमच महापालिका आय़ुक्त म्हणून आलेले शेखरसिंह यांचे हे पिंपरी महापालिकेतील दुसरे बजेट आहे.गतवेळी ते 14 मार्चला सादर करण्यात आले होते. 6 कोटी तीस लाख रुपये शिलकीचे ते होते. मूळ बजेट पाच हजार 298, तर केंद्र सरकारच्या योजना धरून ते सात हजार 127 कोटी रुपयांचे होते. यावेळीही ते किती असेल, याकडे लक्ष लागले आहे. (Pimpri Chinchwad)
दरवर्षी अशा बजेटवर महापालिकेतील सत्ताधारी पक्षाची छाप असते.जरी आयुक्तांनी प्रशासकीय दृष्टीने ते सादर केले असले,तरी उपसूचनांचा पाऊस पाडून स्थायी समितीत ते प्रथम फुगते. नंतर विशेष सर्वसाधारण सभेतही तसेच होऊन अखेरीस ते मंजूर होते. पण,यावेळी तसे काही होणार नाही. कारण पालिकेची मुदतच संपलेली आहे. त्यामुळे आयुक्तांना सादर झालेले बजेटच अंतिम राहणार आहे. त्यात बदल होणार नाही. ते फुगणार नाही.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.