CP Amitesh Kumar : पुण्यातील 'ते' हॉटेल अन् पब चालक आता अमितेश कुमारांच्या रडारवर!

Pune Police News : पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे.
Amitesh Kumar
Amitesh KumarSarkarnama

Punes Hotels and Pub News : नियमावलीचे पालन न करता उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांच्या आदेशांचे पालन होत आहे की नाही यावर वॉच ठेवण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकांकडून नियमित तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल तसेच पबच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली तयार केली आहे. नियमावलीत हॉटेल, पबचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मध्यरात्रीनंतर हॉटेल, पब सुरू ठेवल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकांकडून नियमित तपासणी करण्यात येणार आहे. ध्वनिवर्धकाचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त नसावा. रहिवासी भागातील पब, हॉटेलचालकांनी सामान्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे कुमार यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amitesh Kumar
ACP Mugutlal Patil : ...अखेर ACP मुगुटलाल पाटील यांची पोलिस आयुक्त चौबेंकडून तडकाफडकी बदली!

शहरात काही इमारतींच्या छतावर (रुफटॉप) हॉटेल सुरू करण्यात आले आहेत. तेथे बेकायदा मद्य विक्री केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. बेकायदा मद्य विक्री करणे गुन्हा आहे. त्यामुळे असे प्रकार निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'नियमभंग करणारे परमीट रूम, हॉटेल, पबचालक यांना नोटीस बजावली जाणार आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कलम 144 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यवसायास परवानगी आहे. रात्री दहानंतर ध्वनिवर्धकाचा वापर केल्यास कारवाई केली जाणार आहे.' असं पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी म्हटलं आहे.

Amitesh Kumar
Amitesh Kumar News : 'भाई-डॉन बनण्याचा नाद सोडा'; अमितेशकुमारांचा गुन्हेगारांना कडक इशारा...

पोलिसांनी केलेल्या सूचना -

- हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार किंवा डीजे येणार असल्यास त्याची माहिती देणे गरजेचे

- स्वच्छतागृह वगळून हॉटेलमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक

- हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या तसेच बाहेर पडण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक

- सीसीटीव्ही चित्रीकरणातील डेटा साठविण्यासाठी दोन डीव्हीआर यंत्रे असावेत

- हॉटेलमधील कर्मचारी, सुरक्षारक्षकांची चारित्र्यपडताळणी करावी

- कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल असल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्तांची परवानगी आवश्यक

- हॉटेलमध्ये धुम्रपानासाठी (स्मोकिंग झो) स्वतंत्र जागा असावी

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com