Ajit Pawar News : आईसोबत गेलो तर तुमच्या पोटात का दुखलं, अजितदादांचा सवाल !

Shirur Lok Sabha Constituency : प्रत्येक मतदानाला आई माझ्यासोबत मतदानासाठी येते. यांच्या पोटात आत्ताच का दुखलं? आईनं मला सांगितलं, आपण दोघांनी सोबतच जायचं, म्हणून प्रत्येकवेळी प्रमाणे आम्ही एकत्र जाऊन मतदान केलं
Baramati Lok Sabha 2024
Baramati Lok Sabha 2024Sarkarnama
Published on
Updated on

Shirur News : बारामतीमध्ये मी आईसोबत मतदानाला गेलो. मी ज्या आईच्या पोटी जन्म घेतला, तिला सोबत घेऊन मतदानाला जाणार ना, प्रत्येक मतदानाला आई माझ्या सोबत येते, यांच्या पोटात आता का दुखलं? असा प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांबाबत नाराजी व्यक्त केली.

बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान मंगळवारी पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, आई आशाताई अनंतराव पवार यांच्या सोबत जाऊन काटेवाडीतील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजाविला. मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजितदादांनी मेरे पास मॉ है, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर त्यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी टीका करत आईला नेऊन अजित पवार राजकारण करत असल्याचे त्यांनी म्हंटलं होतं. यावरून कालपासून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अजितदादांनी या चर्चांना उत्तर दिलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Baramati Lok Sabha 2024
Kolhe on Adhalrao:कट्टर राजकीय विरोधक ते पक्के मित्र; कोल्हेंकडून आढळरावांना बर्थडेच्या शुभेच्छा!

शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवारांनी मंचर येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी यावर भाष्य करत आपले बंधू श्रीनिवास पवार यांच्यासह विरोधकांचा कडक शब्दात समाचार घेतला. अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडून दुसरी वाट धरल्याने संपूर्ण पवार कुटूंबिय नाराज झाले आहे. त्यांच्या मागे कुटूंबातील कोणीही व्यक्ती नाही. त्यांच्या या वागणुकीमुळे आई देखील नाराज असून ती अजितदादांबरोबर राहत नसल्याचा आरोप श्रीनिवास पवार यांनी केला होता. त्यानंतर लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी आई आशाताई पवार यांना बरोबर नेऊन ती नाराज नसल्याचे अजितदादांनी अप्रत्यक्षणे दाखवून दिल्याचे बोलले जात आहे.

यावरून राजकारण सुरू झाल्याने अजितदादांनी आपली खंत शिरूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या सभेत बोलून दाखविली. ते म्हणाले, माझ्या आईसोबत मतदानाला गेलो, तुमच्या का पोटात दुखलं? ज्या आईच्या पोटी जन्माला आलो. तिच्याबरोबर मतदानाला गेलो तर काय झालं. बरं पहिल्यांदाच गेलो असं नाही ना? प्रत्येक मतदानाला आई माझ्यासोबत मतदानासाठी येते. यांच्या पोटात आत्ताच का दुखलं? काय म्हणाले तर, दादा राजकारण करतायेत. आता यात कसलं आलं राजकारण. आईनं मला सांगितलं, आपण दोघांनी सोबतच जायचं, म्हणून प्रत्येकवेळी प्रमाणे आम्ही एकत्र जाऊन मतदान केलं, असे अजित पवार म्हणाले.

Baramati Lok Sabha 2024
Sharad Pawar: पवारांच्या प्रादेशिक पक्ष विलीनीकरणाच्या विधानाला चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्याचा संदर्भ, मुनगंटीवारांचा दावा

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत अजित पवारांनी (Ajit Pawar) आढळरावांना विजयी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, लोकसभेला आढळराव आणि दिलीप वळसे पाटलांना विधानसभेला असं मतदान तुम्ही आजपर्यंत करत आहात. पणा बाबांनो आता असं काही करू नका. आत्ताचे खासदार काहीही कागदपत्रे दाखवतात अन् म्हणतात मी अजित दादांकडे पाठपुरावा केला. गडी अलीकडच्या तारखा टाकतोय अन् कागद नाचवतोय. धादांत खोटं बोलत आहे. पदाशिवाय विकास होत नाही. राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचे सरकार असेल तर विकास कामे करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाही, असेही पवार यांनी सांगितले.

Baramati Lok Sabha 2024
Vidhanparishad Election News : राज्यातील विधानपरिषदेच्या 'या' चार जागांसाठी होणार निवडणूक; कोणाची लागणार वर्णी ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com