Amol Kolhe and Adhalarao Patil News : राजकारणातील कट्टर वैरी आढळराव आणि कोल्हे जेव्हा `शिवनेरी`वर समोरासमोर आले...

Shirur Lok Sabha Constituency : जाणून घ्या, तेव्हा नेमकं काय घडलं? ; व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
Amol kolhe-Shivajirao Adhalrao Patil
Amol kolhe-Shivajirao Adhalrao PatilSarkarnama

Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि या मतदारसंघाचे माजी खासदार, शिंदे शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव -पाटील यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून कट्टर राजकीय वैमनस्य आहे. पण, त्याचा काही काळ तरी विसर पडावा ,अशी घटना गुरुवारी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर घडली. जेव्हा हे दोघेही समोरासमोर आले.

कोल्हे चक्क आढळरावांच्या पाया पडले, त्यामुळे त्याची मोठी चर्चा झाली. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला शिवनेरीवर हा प्रसंग घडला. आढळराव हे शिवरायांच्या जन्मस्थळाला वंदन करून परतत होते, तर कोल्हे हे त्यासाठी चालले होते. या वेळी ते समोरासमोर आले. यानंतर खासदार कोल्हे हे आढळरावांच्या पाया पडले, तर आढळरावांनीही त्यांची पाठ थोपटली. नंतर दोघांनी हस्तांदोलन केले.

Amol kolhe-Shivajirao Adhalrao Patil
Lok Sabha Election: "माझ्या प्रचारासाठी भावाला..." अजितदादांच्या धावपळीवर सुप्रिया सुळेंची टोलेबाजी

या वेळी कोल्हेंसोबत असलेले विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनीही आढळरावांना वाकून नमस्कार केला, तर या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या दोघांच्याही समर्थकांनी जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. दरम्यान, शिवजयंतीसाठी गडावर आलेल्या ही भेट पाहिलेल्या एका बाल शिवप्रेमीने तुमची मालिका खूप आवडते, असे कोल्हेंना या वेळी सांगताच त्याला सर्वांनीच हसून दाद दिली.

आढळरावांचा खासदारकीचा चौकार गतवेळी 2019ला कोल्हेंनी चुकविला. तेव्हापासून त्यांच्यात राजकीय वैर निर्माण झाले. नंतर ते टोकाला गेले, आता हे दोघे पुन्हा शिरूर या लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या माध्यमातून भिडणार आहेत. त्यांच्या मतदारसंघात जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ला आहे. तेथे ही प्रतिस्पर्ध्यांची भेट झाली जी चर्चेचा विषय ठरला. त्यावर वयस्कर व्यक्तींना वाकून नमस्कार करणे ही आपली संस्कृती असल्याचे सांगत राजकारणातही ती जपली पाहिजे, असे कोल्हे म्हणाले.

Amol kolhe-Shivajirao Adhalrao Patil
Baramati Loksabha 2024 : तटस्थ, नाराज पदाधिकाऱ्यांना अजितदादांचा वादा

मात्र, सध्या खुनशीपणाचे राजकारण सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजकारण नाही, तर शिवसंस्कार हा आमचा पिंड आहे, असे म्हणत या भेटीचा व्हिडिओ कोल्हेंनी आपल्या फेसबुक पेजवरही शेअर केला आहे, तर आगामी विधानसभेचे गणित म्हणून आढळरावांच्या पाया पडले असे विचारले असता त्यांचा आशीर्वाद मी नेहमी घेत आलो आहे, असे शेरकरांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com