Baramati Loksabha 2024 : तटस्थ, नाराज पदाधिकाऱ्यांना अजितदादांचा वादा

Pune Election Campaign Strategies : खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांना दादांचा फोन? तटस्थ, नाराज पदाधिकाऱ्यांना अजितदादांचा वादा.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune Loksabha News : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये (Baramati Loksabha Constituency) अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अजित पवारांनी या मतदारसंघामध्ये आपल्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. असे असताना बारामती मतदारसंघातील खडकवासला मतदारसंघात दादांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.

खडकवासल्यामध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) या फुल अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसत असताना सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी पवारांचे काही मोजकेच पदाधिकारी मैदानात उतरले असून, अनेक पदाधिकारी सुनेत्रा पवार अथवा अजित पवार (Ajit Pawar) येतात, त्याच वेळी प्रचारात येताना दिसत नसल्याचे चित्र आहे. तसेच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर या भागातील अनेक नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्या सोबतच राहणं पसंत केला आहे. तसेच काही जणांनी कोणतीही भूमिका न घेता तटस्थपणा स्वीकारला आहे. त्यामुळे यामध्ये दादांनी स्वतः लक्ष घालून नाराज, तटस्थ आणि दुसऱ्या गटातील पदाधिकाऱ्यांना फोन करून तुमची जी काही कामे असतील, ती मार्गी लागतील. तटस्थ राहण्यापेक्षा आपल्याकडे या, असा वादा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar
Nashik Constituency 2024 : भुजबळांच्या समोरच कार्यकर्ता म्हणाला "फ्रेश उमेदवार द्या"

बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघांमध्ये राज्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. शरद पवार गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची असणार आहे, तर अजित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असली तरी त्या पूर्वीपासूनच सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या कामाला लागल्या असल्याचे पाहायला मिळाले आहे.

मागील तीन लोकसभा निवडणुका सुप्रिया सुळे यांनी चांगल्या मताधिक्यांनी जिंकल्या असल्या तरी खडकवासला मतदारसंघामध्ये मात्र त्या पिछाडीवरती असल्याचे चित्र पाहायला मिळालं आहे. मागील दोन निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी एकसंध असताना आणि काँग्रेसची (Congress) मोठी ताकद सुप्रिया सुळे यांच्यासोबत असतानादेखील या मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांना खूप कमी मताधिक्य मिळाल्याचे पाहायला मिळाला आहे. यामुळे सुप्रिया सुळे यांनी यंदा सर्वाधिक लक्ष खडकवासला मतदारसंघावर केंद्रित केल्याचे पाहायला मिळत आहे.

खडकवासला मतदारसंघातील सुप्रिया सुळे यांच्या झंझावती दौरे पाहता अजित पवार गटांमध्ये थोडीशी अस्वस्थता आहे. त्यामुळे दादांनी आपल्या विचारांचे नाही, तटस्थ आहेत, त्यांच्या भेटी घेऊन त्यांना आपल्याबरोबर घ्या, असा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. एवढेच नव्हे तर स्वत: अजित पवार यांनी नाराज, तटस्थ आणि दुसऱ्या गटातील पदाधिकाऱ्यांना फोन करून मिळून काम करण्याची दादा स्टाइलने विनंतीदेखील केली आहे.

यातील बहुतांश फोन हे वारजे, धायरी, बावधन भागांतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील (Sharad Pawar NCP) पदाधिकाऱ्यांना केले आहेत. यामध्ये माजी नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकारी आणि सदस्य आहेत. स्वत: दादांनी फोन करून काम करण्याची विनंती केल्याने काय करावे, पदाधिकारी संभ्रम अवस्थेत आहेत.

Edited By : Rashmi Mane

R

Ajit Pawar
Varun Gandhi News : कसलीही किंमत मोजावी लागली तरी..! उमेदवारी नाकारल्यानंतर वरुण गांधींचं भावनिक पत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com