Ajit Pawar News : आढळरावांच्या मताधिक्याचा प्रश्न अन् अजितदादांचे थेट उत्तर !

Shirur Lok Sabha Constituency : शिरूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा रंगत आहे.
Ajit Pawar- Shivaji Aadhalrao Patil
Ajit Pawar- Shivaji Aadhalrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune news : बारामती लोकसभा मतदारसंघापाठोपाठ सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्ज भरण्यात आला. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आढळराव पाटील हेच निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. मात्र, आढळरावांना किती मताधिक्य मिळेल, या प्रश्नावर मी काही ज्योतिषी नाही, असे थेट उत्तरच त्यांनी दिले.

लोकसभा (LOKSABHA) निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून, सर्वच मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडत आहे. राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर सत्तेत सहभागी होत लोकसभेच्या निवडणुकीला महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला.

महायुतीच्या जागावाटपामध्ये पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या चार जागांपैकी बारामती, शिरूर या दोन जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आपल्याकडे येतील असे अजित पवार यांना वाटत होते. मात्र, कोल्हे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर राहणे पसंत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar- Shivaji Aadhalrao Patil
Jayant Patil News : व्यापारी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा देशाचा प्रमुख होतो, तेव्हा...! जयंत पाटील यांची टीका

खासदार कोल्हे शरद पवार यांच्याबरोबर गेल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हे यांचा पराभव करणार म्हणजे करणारच, असा संकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोडला. जाहीर सभांमध्ये अजितदादांनी कोल्हे यांचा पराभव करण्याचे बोलून दाखविले होते. त्यासाठी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात दौरे करून नागरिकांशी संवाददेखील साधला होता. खासदार कोल्हे यांच्या विरोधात उभे राहण्यासाठी अजित पवार यांना सक्षम उमेदवार मिळत नसल्याने शिवसेना शिंदे गट यांचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांना अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे.

या मतदारसंघातून निवडणूक लढविणारे कोल्हे आणि आढळराव या दोन्ही उमेदवारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगत आहे. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणारे अमोल कोल्हे यांनी गेल्या आठवड्यात आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी आपला अर्ज दाखल केला. जोरदार शक्तिप्रदर्शन करून या वेळी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये अजित पवार गॉगल घालून सहभागी झाले होते. या वेळी, त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तर देताना आपल्याच उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. मात्र किती मताधिक्याने आढळराव विजयी होतील, या प्रश्नाला उत्तर देताना 'एक मिनीट.. मी त्यामधला ज्योतिषी नाही', असे उत्तर त्यांनी दिले.

Ajit Pawar- Shivaji Aadhalrao Patil
Revati Sule News : आईच्या प्रचारासाठी लेक मैदानात !

जाहीरनामा वाचला नाही

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला शपथनामा प्रसिद्ध केला आहे. या शपथनाम्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, ते म्हणाले माझा त्या पक्षाची काहीही संबंध नाही, मी तो जाहीरनामा वाचला नाही, वाचल्याशिवाय उत्तर देणार नाही. ते विरोधक आहेत. त्यामुळे ते सत्ताधारी पक्षावर आरोप करणारच ते त्यांचे काम आहे. पण देशात मोदी सरकारने अनेक कामे केली आहेत. यापुढील काळातही करतच राहतील, असे अजित पवार म्हणाले.

R

Ajit Pawar- Shivaji Aadhalrao Patil
Amol Kolhe News : शिवाजीराव आढळराव पाटील डमी उमेदवार; अमोल कोल्हेंनी उडवली खिल्ली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com