Shirur Loksabha News : शिरुरचे माजी खासदार फक्त व्यापार करण्याण्यासाठी संसदेत गेले. त्यांना जनतेची आस नव्हती, तर आपली कंपनी वाढविण्याचा हव्यास होता. म्हणून आपल्या सॉफ्टवेअर कंपनीशी निगडीत असलेल्या संरक्षण विभागाचेच बहूतांश प्रश्न त्यांनी लोकसभेत विचारले, जनतेचे नाही,असा हल्लाबोल शिरुरचे आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी परवा (३० एप्रिल) ओतूर (ता.जुन्नर) येथील सभेत नाव न घेता महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव -पाटील यांच्यावर केला होता. त्याचा कडक शब्दांत समाचार आढळरावांनी आज घेतला. त्यातून या दोघांतील संघर्ष आता टोकाला गेल्याचे दिसून आले आहे.
डॉ. अमोल कोल्हेंच्या आरोपावर शिवाजीराव आढळराव जाम भडकल्याचे दिसले. त्यातून त्यांनी नाव घेत कोल्हेंवर तोफ डागली.आपली कंपनी ही सॉफ्टवेअरची नाही,तर हार्डवेअऱची असल्याचे स्पष्ट केले.तसेच तिच्याशी सबंधित एक,जरी प्रश्न मी विचारल्याचा पुरावा असेल,तर मी शर्यतीतून बाजूला होतो, नाहीतर, कोल्हेंनी माफी मागत उमेदवारी मागे घ्यावी, असे थेट आव्हान त्यांनी दिले.
पराभव समोर दिसू लागल्याने कोल्हे असबंद्ध बोलू लागले आहेत,असे आढळराव म्हणाले.आता त्याला कोल्हे काय उत्तर देतात,याकडे आता लक्ष लागले आहे. खोटं बोलणं आणि अभिनय करणे हा तुमचा व्यवसायच आहे,पण त्याचा गैरवापर करू नका,असा टोला आढळरावांनी कोल्हेंना लगावला.भाषण करणे आणि मतदारसंघात न फिरणे हेच त्यांचे काम आहे,अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
विचारण्यासारखा एकही प्रश्न नसल्याने त्यांचा पोटसूळ उठून ते घाणेरडे आरोप करू लागले आहेत,असा हल्लाबोल त्यांनी केला.गेले तीन महिने ते नुसते कांदा,कांदा करीत आहेत. पण,त्यांनी तो आणि इतर विचारलेले प्रश्न सुटले का,असा सवाल आढळरावांनी केला.तसेच संरक्षण विभागालाच आव्हान देणे हा त्यांचा बालिशपणा असल्याचे त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उमेदवारीचे संकेत मिळताच आढळराव-कोल्हेंत 'तू तू मै मै'सुरु झाली. तिने आता टोकच गाठले आहे.प्रत्येक सभेत ते एकमेकांचा उद्धार करीत असून विविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. याअगोदर कोल्हेंनी आढळरावांना डमी उमेदवार म्हणून डिवचलं होतं. त्याला मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे, असं उत्तर आढळरावांनी दिलं होतं. आता कंपनीच्या प्रश्नावर दिलेले आव्हान कोल्हे स्वीकारता का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.