Amol Kolhe News :... तर महाराष्ट्राने तुम्हाला का साथ द्यावी; डॉ. अमोल कोल्हेंचा महायुतीच्या नेत्यांना थेट सवाल

Political News : कांदा निर्यातबंदीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे पाप केल्याची घणाघाती टीका शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
Amol Kolhe
Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने राज्यभरात निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे उमेदवारांकडून भेटीगाठीवर भर दिला जात असला तरी एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नसल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्यासंबधी कोणतेही नोटीफिकेशन काढलेले नाही. याचाच अर्थ कांदा निर्यात बंदी उठलेलीच नाही. कांदा निर्यातबंदीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे पाप केल्याची घणाघाती टीका शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केली. (Amol Kolhe News)

Amol Kolhe
Parbhani Lok Sabha Constituency : परभणीत जानकर-जाधवांमध्ये काँटे की टक्कर; शिट्टी तर वाजली, पण...

महाराष्ट्राची भाकरी खाऊन, गुजरातची चाकरी करायची असेल तर महाराष्ट्राने तुम्हाला का साथ द्यावी, याच उत्तर द्यावे, असा थेट सवाल डॉ. अमोल कोल्हे यांनी यानिमत्ताने केला आहे.महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे शनिवारी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी टीका केली.

त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा निर्यातबंदीबद्दल केलेल्या गुजरातच्या कांद्याची निर्यातबंदी ज्यांनी उठवली आणि गुजरातच्या शेतकऱ्यांच भल केले. त्यानंतर महाराष्ट्रात रोष निर्माण झाला असल्याचा आरोपही यावेळी कोल्हे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्राने का तुम्हाला साथ द्यावी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यामुळं घाईघाईने खोट ट्विट करावे लागत असेल तर, फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांनी, महायुतीच्या उमेदवारांनी याच उत्तर द्यावे, महाराष्ट्राची भाकरी खाऊन, गुजरातची चाकरी करणार असाल तर महाराष्ट्राने का तुम्हाला साथ द्यावी, याचे उत्तर द्यावे, असा थेट सवाल डॉ. कोल्हे यांनी केला आहे.

(Edited By : sachin Waghmare)

Amol Kolhe
Amol Kolhe criticism of Narendra Modi : मग मतं मागायला महाराष्ट्रात..., कोल्हेंनी मोदींना सुनावले !

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com