Shirur News : विनापरवाना वृक्षतोड : शिरूर पंचायत समितीला अद्दलच घडली; दंड अन्‌ बरंच काही....

वड, पिंपळ, कडूलिंब, चिंचेची प्रत्येकी दहा आणि इतर देशी जातींची चाळीस झाडे लावण्याचा आदेश मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर यांनी पंचायत समितीला दिला.
Shirur Panchayat Samiti
Shirur Panchayat SamitiSarkarnama
Published on
Updated on

शिरूर (जि. पुणे) : शिरूर (Shirur) पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) आवारात झालेल्या विनापरवाना वृक्षतोडीची दखल घेत नगरपरिषदेने पंचायत समितीला पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला. तसेच, तोडलेल्या झाडांच्या बदल्यात देशी ८० झाडे लावण्याचा व त्यांचे संगोपन करण्याचा आदेश दिला. या झाडांचे जतन व संगोपन व्यवस्थित होण्यासाठी अनामत म्हणून २० हजार रूपयांची रक्कम जमा करण्याचे आदेशही नगर परिषदेचे मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर यांनी दिले. (Shirur Panchayat Samiti fined Rs 5,000 in case of felling of trees without permission)

भारतीय बहुजन पालक संघाचे राज्य संयोजक नाथा पाचर्णे यांनी पंचायत समिती आवारातील बेकायदा वृक्षतोडप्रकरणी नगर परिषदेकडे तक्रार केली होती. या वृक्षतोडीस गटविकास अधिकारी अजित देसाई व यशवंत वाटमारे हे जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, या मागणीची दखल न घेतल्याने त्यांनी गुरुवारपासून (ता. ६ एप्रिल) नगर परिषदेसमोर उपोषण आंदोलन सुरू केले होते. विविध संघटनांनी व वृक्षप्रेमींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

Shirur Panchayat Samiti
Solapur News : जत्रेतील ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्यासाठी लावली चक्क बोली : साठी पार केलेल्या शेतकऱ्याने मारली बाजी!

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरूर नगर परिषदेने पंचायत समितीकडे खुलासा मागविला होता. त्याबाबत पंचायत समितीने केलेला खुलासा अमान्य करून नगर परिषदेने दंडात्मक कारवाई केली. या कारवाईची माहिती व त्याबाबतचे लेखी पत्र मुख्याधिकारी ॲड. बोरकर यांनी पाचर्णे यांना दिल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी उपोषण मागे घेतले. नाथा पाचर्णे यांच्या हस्ते नगर परिषदेसमोर वृक्षारोपण करून आंदोलन थांबविण्यात आले.

Shirur Panchayat Samiti
Samadhan Awatade News : आमदार समाधान आवताडेंनी राजकारण सोडण्याचा दिला इशारा; मंगळवेढ्यातील बैठकीत नेमके काय झाले?

झाडाच्या संगोपनाचा दर सहा महिन्यांनी तीन वर्षे अहवाल द्या

पंचायत समिती आवारातील दोन वडाची झाडे छाटण्यात आली असून, चार गुलमोहोराची झाडे तोडण्यात आली होती. त्याबदल्यात वड, पिंपळ, कडूलिंब, चिंचेची प्रत्येकी दहा आणि इतर देशी जातींची चाळीस झाडे लावण्याचा आदेश मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर यांनी पंचायत समितीला दिला. ही झाडे सहा ते आठ फूट उंचीची असावीत आणि त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांचे योग्य संगोपन करावे. तसा अहवाल दर सहा महिन्यांनी असा तीन वर्षे सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे. नव्याने लावण्यात येणाऱ्या ८० झाडांचे संगोपन करण्याबाबत अनामत म्हणून वीस हजार रूपये नगर परिषद कोषागारात जमा करण्याचे आदेशही देण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com