Shiv Sangram Jyoti Mete News : शिवसंग्रामचा पाठिंबा कोणाला? महायुती का महाविकास आघाडी ज्योती मेटे यांनी स्पष्टच सांगितले !

Beed Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेबाबतचा निर्णय शिवसंग्राम पक्षाकडून घेण्यात येईल..
Jyoti Mete
Jyoti Mete Sarkarnama

Pune News : लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम महाविकास आघाडीला का? महायुतीला पाठिंबा देणार याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आज पुण्यामध्ये शिवसंग्राम संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर ज्योती मेटे यांनी पत्रकार परिषद घेत या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्रामचा पाठिंबा कोणाला असेल, याबाबतची स्पष्टता दिली. या वेळी शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे उपस्थित होते.

मेटे म्हणाल्या, दोन टप्प्यामधलं महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान झालं आहे. इतर दोन टप्प्यातलं मतदान अद्यापही होणं बाकी आहे. या निवडणुकीत आता शिवसंग्राम संघटनेचे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांना आपला पाठिंबा नसल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणुकीमध्ये शिवसंग्रामने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असून, निवडणुकीनंतर विधानसभेबाबतचा निर्णय घेण्यात येईल. शिवसंग्राम विधानसभा निवडणूक लढवणार आहे. मात्र, त्यावेळी कोणासोबत जायचं हे त्यावेळीची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल, असं ज्योती मेटे यांनी स्पष्ट केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jyoti Mete
Ajit Pawar On Supriya Sule : मला तर लाज वाटली असती, तुम्ही कोणत्या तोंडाने मत मागता, दादांचा ताईंना सवाल !

बीड (Beed) येथून लोकसभा निवडणूक लढावी अशी लोकांची इच्छा होती. त्यामुळे ही निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र नंतर सारासार विचार करून निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका यापूर्वी स्पष्ट केली असल्याचं ज्योती मेटे यांनी सांगितलं. दरम्यान, बीड लोकसभा निवडणूक लढण्यासाठी ज्योती मेटे या आग्रही होत्या. यासाठी त्यांनी शरद पवार यांच्याशी भेट घेऊन महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याची इच्छादेखील प्रदर्शित केली होती, असे असल्याचं बोललं जातं.

महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर ज्योती मेटे ह्या शिवसंग्राम या पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र त्याबाबत एक मत होऊ न शकल्याने त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra-fadanvis) यांचीदेखील भेट घेतली होती. त्यामुळे ज्योती मेटे आणि शिवसंग्राम काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी आता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असली तरी त्या महायुतीतून बाहेर पडलात का, याबद्दल स्पष्टपणे बोलणं मात्र त्यांनी टाळलं.

R

Jyoti Mete
Lok Sabha Election 2024 : शरद पवार, उद्धव ठाकरे संपले; मग PM मोदींच्या सभांचा धडाका कशासाठी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com