Pune News : भोर परिसरातील एमआयडीसीचा मुद्दा पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावरती तापल्याचा पाहायला मिळत आहे. निवडणूक आल्यानंतर भोर आणि राजगड (वेल्हा) परिसरात एमआयडीसी उभारण्याच्या घोषणा नेत्यांकडून करण्यात येतात. मात्र, निवडणुका तर नेत्यांना याबाबतचा विसर पडत असल्याचं चित्र गेल्या अनेक वर्षांपासून भोर आणि वेल्हाकर अनुभवत आहेत. यंदादेखील एमआयडीसीच्या मुद्द्यावरून भोरचे राजकारण तापले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. याच मुद्द्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आज बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी मेळावा घेतला. मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार म्हणाले, ही निवडणूक भावकीची आणि भावनिक नाही. ही रोजी रोटीची आहे. काही लोक भोर, वेल्हेकरांना एमआयडीसीचा स्वप्न दाखवून गेले.
एमआयडीसीच्या मुद्द्यावरती 2014 ला मत मागितली. मात्र हे एमआयडीसीचं काम पूर्ण केलं नाही. तरीदेखील तेच लोक 2019 ला मत मागायला आले होते आणि आताही मत मागत आहेत. मी असतो तर मला लाज वाटली असती. कोणत्या तोंडाने मत मागता आहेत, असा सवाल अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांना केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भोर परिसरातील एमआयडीसीचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकसभेची आचारसंहिता संपल्यावर ती लगेच प्रयत्न करणार असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं. यासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन जागेबाबतचा प्रस्ताव आपल्याला द्यावा असंदेखील अजित पवार म्हणाले. आत्ताच्या खासदारांनी कार्यपुस्तिका छापली आहे. त्यात मी केलेली कामं छापली. मी केलं... मी केलं... ते सांगत आहेत. मात्र, या खासदारांनी भोर साठी काय केलं हे सांगावं सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी नुस्ती भाषणं विकास होत नसतो, असा टोला सुळे यांना लगावला.
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना तुम्ही तीन वेळा निवडून दिलं आता सुनेत्रा पवार यांना निवडून द्या, मी तुम्हाला एमआयडीसी देणार आहे. मी शब्दाचा पक्का असल्याचं अजितदादा म्हणाले. भोर वेल्हा परिसरामध्ये असलेल्या धरणांचे पाणीवाटप करारानुसार करून पाणी योजना भोर वेल्हा भागासाठी राबवणार असल्याचा अजित पवार यांनी सांगितलं, तसेच या परिसराला नैसर्गिक सौंदर्य लाभले असून, यासाठी पर्यटन वाढवण्याच्या दृष्टिकाेनातूनदेखील उपाययोजना करणार असल्याचंदेखील अजित पवार यांनी सांगितले. यासाठीचा निधी आपण मंजूर करून आणू, असा विश्वास त्यांनी या वेळी दर्शवला.
(Edited by : Chaitanya Machale)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.