Akshay Shinde case : ही फेक 'एन्काऊंटर'ची स्क्रिप्ट? सुषमा अंधारेंनी मुद्यांवर ठेवलं बोट

Sushma Andharan Serious Allegations About Akshay Shinde Encounter In Badlapur Child Lagging Atrocities : बदलापूर बाललैंगिक अत्याचारातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी चकमकीत ठार केल्याच्या घटनेवर सुषमा अंधारे यांचे सरकारवर गंभीर आरोप.
Sushma andhare
Sushma andhareSarkarnama
Published on
Updated on

Pune News : बदलापूरमधील दोन चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा सोमवारी सायंकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला.

आता राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाबाबत काही सवाल सरकारला केलेत.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे म्हणल्या, "अक्षय शिंदे याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती. परंतु कायद्याची प्रक्रिया बायपास होता कामा नये. बदलापूर प्रकरणांमध्ये पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला. पोलिसांकडून (Police) तपास संथ गतीने सुरू होता". काल चकमकीचा प्रकार घडला, तेव्हा आरोपी अक्षय शिंदेला तळोजामधून बदलापूरमध्ये न्यायचं असेल, तर गाडी मुंब्राकडे का नेली? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. तसंच ज्या पिस्तूलने अक्षयवर गोळी झाडली गेली, ती पिस्तूल अनलोडेड असते. अक्षय शिंदे याला पिस्तूलचे लॉक कसे काढता आले? हा देखील महत्त्वाचा प्रश्न या प्रकरणांमध्ये उपस्थित होत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

Sushma andhare
Akshay Shinde Encounter : 'ती' गोळी पोलिसाच्या मांडीला कशी लागली? प्रकाश आंबेडकरांची मेडिकल रिपोर्टची मागणी

दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस, पोलिसांच्या कमरेला लागलेलं पिस्तूल कसं काढलं जातं, असे अनेक प्रश्न या घटनेसंदर्भात सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले. अक्षय शिंदे गतिमंद होता, असे पोलिसांनी सांगितलं होतं, तर मग तो एवढा हुशार कसा निघाला? याचे उत्तर देखील लोकांना मिळायला हवं, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं. आरोपी अक्षय शिंदे याला संपवल्यामुळे हे प्रकरण संपत नाही. कोणाला वाचवल्या जातेय आहे? ही संपूर्ण घटना राज्य प्रायोजित दहशतवाद आहे, असा गंभीर आरोप देखील शिवसेनेच्या (Shiv Sena) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

Sushma andhare
Supriya Sule News : राज्याचा मुख्यमंत्री कसा व्हावा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

अक्षय शिंदे प्रकरणावर आम्ही कोर्टात जाणार असून '3002' किंवा '3014' मध्ये तारीख दिली, तरी आम्ही न्याय मागत राहणार, असे ठणकावून सांगत ही फेक 'एन्काऊंटर'ची स्क्रिप्ट आहे. 9 एमएमचे पिस्तूल सामान्य माणसाला त्याचं लॉक उघडता येत नाही. आता या प्रकरणवर एसआयटी स्थापन करणे म्हणजे थट्टा आहे. 'माझीच बॅट, माझाच बॉल', असं होणार असून ही पोलिसांनी एक कल्पित कथा कशी मानायची? असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com