Shivsena UBT : 'तानाजी सावंतांवर गुन्हा दाखल करा', ठाकरेंचे शिलेदार पोहोचले पोलिस ठाण्यात

Shivsena UBT Demands FIR Against Tanaji Sawant : तानाजी सावंत यांच्यावर सरकारी यंत्रणेचा गैरवापर केलाय . त्यांनी प्रशासनाचा जो वेळ वाया घातला त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे.
Tanaji Sawant and 
Uddhav Thackeray
Tanaji Sawant Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : माजी मंत्री, शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार सिंहगड पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र, सावंत यांचा मुलगा ऋषिराज हा मित्रांसोबत बँकाॅकला जात असल्याचे समोर आले. त्याला परत आणण्यासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला आहे.

तानाजी सावंत यांच्यावर सरकारी यंत्रणेचा गैरवापर केलाय . त्यांनी प्रशासनाचा जो वेळ वाया घातला त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी तसेच ज्यांनी पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली त्यांच्यावर देखील कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सिंहगड पोलिस ठाण्यात देण्यात आले.

Tanaji Sawant and 
Uddhav Thackeray
Ashok Chavan News : आरोप होताच राजीनामा घेण्याची पद्धत काँग्रेसमध्ये, मी त्याचा बळी ठरलो होतो!

कुटुंबातील भांडणामुळे घरी कोणालाही न सांगता बँकाॅकला चाललेल्या मुलासाठी माजी मंत्री तानाजी सावंत यांनी त्यांच्या मुलाच्या शोधासाठी सगळी पोलिस यंत्रणा व सरकारी यंत्रणा कामाला लावली, यासाठी झालेला सर्व खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे.

संतोष देशमुख यांचा हत्येली आरोपी अजून सापडत नाही. मात्र आठ तासात तानाजी सावंत यांचा मुलगा कसा सापडतो? असा प्रश्न देखील शिवसैनिकांनी उपस्थित केला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, शहर प्रमुख संजय मोरे, शिवसेना नेते वसंत मोरे, रेखा कोंडे आदी उपस्थित होते.

काँग्रेसकडून प्रशासनावर टीका

अवघ्या आठ तासांत तानाजी सावंत यांच्या मुलाचा शोध लावणाऱ्या पोलिस यंत्रणेसह, महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, व्हीआयपीच्या मुलाबाबत पोलिसांनी जेवढी तत्परता दाखवली तेवढी सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबत का दाखवली नाही.

Tanaji Sawant and 
Uddhav Thackeray
Vishal Patil : महिलांच्या सुरक्षेवरून विशाल पाटील संसदेत आक्रमक; मोदी सरकारला घेरत सुनावले खडे बोल, म्हणाले, 'कुठे आहे तरतूद?'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com