शिवाजीराव भोसले बँक घोटाळ्यात साताऱ्यातून एकाला अटक

अनिल भोसले व मंगलदास बांदल यांच्या बनावट खात्यावरील कर्ज प्रकरणाचे हप्ते भागवण्यासाठी इतर कर्ज प्रकरणे करण्यात आली होती.
Pune Crime
Pune CrimeSarkarnama
Published on
Updated on

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सातारा येथून एकाला शुक्रवारी अटक केली. पोलिसांनी बनावट धनादेश प्रकरणी ही अटक केली असून न्यायालयाने त्यास सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Pune Crime
राज्य सरकारने चालवलाय युवकांच्या ‘करिअर’शी खेळ

अमर श्रीरंग जाधव (रा. क्षेत्र माहूली,ता. सातारा) असे अटक केलेल्याचे व्यक्तीचे नाव आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर जाधव हा पैलवान आहे. मार्च 2017 मध्ये शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्यात बनावट धनादेश दिल्याचे प्रकरण घडले होते.

Pune Crime
पिंपरीपाठोपाठ शरद पवार पुण्यातही लक्ष घालणार

अनिल भोसले व मंगलदास बांदल यांच्या बनावट खात्यावरील कर्ज प्रकरणाचे हप्ते भागवण्यासाठी इतर कर्ज प्रकरणे करण्यात आली होती. त्यात जाधवने पाच धनादेश वापरुन कागदोपत्री नोंदी दाखवून ही फसवणूक केली आहे. भोसले बँकेचा फंड फिरवण्यामध्ये जाधवचा सहभाग असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्यास सातारा येथून अटक करण्यात आली आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com