Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडला पुण्यात कुणी आश्रय दिला? ठाकरे सेना आक्रमक

Shivsena Aggressive on Walmik Karad: "पुण्यात वाल्मिकला कोणी मदत केली, याची सखोल चौकशी व्हावी आणि मदत करणाऱ्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करा, "
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांना हवा असलेला खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड हा पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण आला आहे. 22 दिवसापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. या दरम्यान तो पुण्यात मुक्कामाला होता, अशी प्राथमिक माहिती आहे. त्याला पुण्यात कोणी मदत केली, कोणी राहण्यास मदत केली, याची चौकशी करा, यासाठी पुण्यातील ठाकरे सेना आक्रमक झाली आहे.

वाल्मिक कराड गेले अनेक दिवस पुण्यात होता, असे त्याच्यासोबत असलेल्या बीडच्या नगरसेवकाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. पुण्यात वाल्मिकला कोणी मदत केली, याची सखोल चौकशी व्हावी आणि मदत करणाऱ्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करा, अशा मागणीचे पत्र पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांकडे दिले आहे.

पुणे शहर प्रमुख संजय मोरे, उपशहर प्रमुख आबा निकम, युवासेना समन्वयक युवराज पारीख, संघटक अजय परदेशी, उपविभाग प्रमुख अनिल परदेशी, सुरेश घाडगे, संजय साळवी, अनंत घरत यावेळी उपस्थित होते.

Uddhav Thackeray
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराड शरण आला तेव्हाची ती आलिशान गाडी कुणाची?

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा, या मागणीसाठी आज मस्साजोगचे ग्रामस्थ जलसमाधी आंदोलन करणार आहेत. वाल्मिक कराड याच्या अटकेनंतर मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून फरार आरोपींनी अटक करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत. वाल्मिक कराडसाठी हे तिघेही काम करत असल्याचे पोलिसांना संशय आहे. फरार आरोपी किती काळ भूमिगत राहणार, की वाल्मिक कराड यासारखे पोलिसांना शरण येणार, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने मंगळवारी दुपारच्या शरणागती नाट्यानंतर त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून केज न्यायालयाने वाल्मिकला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com