Walmik Karad Surrender: वाल्मिक कराड शरण आला तेव्हाची ती आलिशान गाडी कुणाची?

Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो इतक्या दिवस कुठे फरार होता, त्याला कोण वाचवत होते, पोलिसांना तो इतक्या दिवस कसा सापडला नाही, असे अनेक प्रश्न विचारण्यात येत आहे.
Walmik karad CID office pune
Walmik karad CID Office PuneSarkarnama
Published on
Updated on

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात 21 दिवस पोलिसांना गुंगारा देणारा वाल्मिक कराड हा अखेर काल (मंगळवारी) पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण आला. केजच्या न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता वाल्मिक कराड हा ज्या आलिशान स्कॉर्पियो गाडीतून आला, ती गाडी कुणाची याबाबतची चर्चा सुरु आहे.

वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो इतक्या दिवस कुठे फरार होता, त्याला कोण वाचवत होते, पोलिसांना तो इतक्या दिवस कसा सापडला नाही, असे अनेक प्रश्न विचारण्यात येत आहे. मंगळवारी पुण्यात सीआयडी कार्यालयात तो स्कॉर्पियो गाडीतून (एम.एच. 23 बीजे 2231) शरण आला. ही गाडी परळी येथील अजित शिवलिंग मोराळे यांची असल्याची माहिती समोर येत आहे. शिवलिंग मोराळे हे सरकारी कंत्राटदार आहेत. धनंजय मुंडे यांचे मोराळे बापलेक खंदे समर्थक असल्याची माहिती सुत्रांनी सांगितली.

Walmik karad CID office pune
Vasant More : इथे सापडला की ठोकला! वाल्मिक कराड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर वसंत मोरेंनी साधला निशाणा

22 दिवस वाल्मिक कराड हा पोलीस आणि सीआयडीला गुंगारा देत होता. हे मागे कुणाचे षडयंत्र होते, यांची विचारणा होते आहे. हे महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे मोठे अपयश असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मीक याने व्हिडीओ रिलीज केला, स्वतःला क्लीन चिट देतो, यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट आहे, असा आरोपही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

या व्हिडीओमध्ये त्याने आपण निर्दोष असल्याचाही दावा केला आहे. वाल्मिक कराड याच्या शरणागतीनंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराडचा शेवटचा कॉल पुण्याचा होता, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.

Walmik karad CID office pune
Walmik Karad Surrender News : 'ती' कोणती मोठी ताकद संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना वाचवते आहे? खासदास सुळे म्हणाल्या, 'तर समाधान...'

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याच्यावर आरोप केले जात आहेत. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधाकांनी राजकारण करत राहावे. मात्र, आमची भूमिका स्पष्ट आहे की, संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आणि तो आम्ही मिळवून देणार” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचे आहे. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ असो. त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की, फार काही फायदा होईल. त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यावर जायचं नाही. त्याचं समर्थन करायचं नाही आणि विरोधही करायचा नाही," असे फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com