बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी मी पदरचे पैसे खर्च केलेत : आढळराव पाटील

शिवसेना (Shivsena) नेते व माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील (Shivajirao Adhalrao-Patil) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) खासदार डॅा. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर टीका केली आहे.
Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe
Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol KolheSarkarnama

पुणे : बैलगाडा शर्यतीवरील (Bullock Cart Race) बंदी उठवण्यासाठी स्व:तच्या खिशातील पैसे खर्च करून दोन-तीन वेळा बंदी उठवली. हे सर्वांना माहिती आहे. मात्र, काही लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करून दिले आहेत. लोकसभा निवडणूकीवेळी आपण घोडीवर बसू, असे भाषणे करण्यात आली, आता कुठय तुमची घोडी? त्यांना खरच घोडीवर बसायचच असेल तर 11 आणि 12 फेब्रुवारीला लांडेवाडीच्या घाटात या मग बघू कोण बसत घोडीवर, असे थेट आव्हान शिवसेनेचे नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao-Patil) यांनी शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॅा. अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) दिले आहे.

Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe
महाराज; मोदींना माफ करा म्हणत राष्ट्रवादीचे पुण्यात आंदोलन

आढळराव म्हणाले, गेल्या 20 वर्षापासून मी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न केले. याबाबत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कुठेही जा त्या भागातील लोक अजूनही माझी आठवण काढतात की, हा माणूस बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी खंदा पुरस्कर्ता आहे. बंदी उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मी 40 ते 50 लाख रूपये खर्चून 2 ते 3 वेळा बंदी उठवली मात्र, याबाबत काही गैरसमज निर्माण करण्यात आले. 10 ते 15 वर्षांपासून यांना बंदी उठवता आली नाही, असे पसरवण्यात आले. मात्र, त्यांना माहिती नाही की शर्यतीवर बंदी ही फक्त चार ते पाच वर्षापासूनच होती. लोकसभा निवडणूकीवेळी आपण घोडीवर बसू, असे भाषणे करण्यात आली. मात्र, आता कुठय त्यांची घोडी? त्यांना जर खरच घोडीवर बसायचे असल्यास त्यांनी 11 आणि 12 फेब्रुवारीला लांडेवाडीच्या घाटात याव मग बघू कोण घोडीवर बसतोय, असे आव्हान आढळरावांनी खासदार कोल्हेंना दिले केेले आहे. खासदार कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी आपण घोडीवर बसू असे वक्तव्य केले होते. त्याच्या या वक्तव्याचा संगर्भ देत आढळरावांनी कोल्हेंची खिल्ली उडवली आहे.

Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe
पोलिसांनी नाही सोडले : काँग्रेस मुख्यालयातूनच विरोधी पक्षनेत्याला अटक

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील (bullock cart race) बंदी गत १६ डिसेंबरला सशर्त उठवल्यावर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठीची श्रेयवादाची लढाई थांबण्याचे नाव घेतांना दिसत नाही. त्यानंतर सातत्याने श्रेय घेण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात हा मुद्दा महत्वाचा असल्याने महाविकास आघाडीत राज्यात सत्तेत असूनही आढळराव आणि कोल्हे यांच्यात बैलगाडा शर्यतीच्या श्रेयावरून वारंवार खटके उडत आहेत.

बंदी उठल्यावर मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी अखिल भारतीय बैलगाडा संघटना, मावळ आणि मावळ तालुका शिवजयंती उत्सव कमिटीच्या संयुक्त विद्यमाने दत्तजयंती यात्रेचे निमित्त साधून १ जानेवारीला ही शर्यत आयोजित करण्याचे ठरवले होते. राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार आणि खासदार कोल्हे हे यावेळी उपस्थित राहणार होते. याच दिवशी आढळराव यांनीही आपल्या गावी (लांडेवाडी,ता.आंबेगाव) येथे ती भरविण्याचे निश्चीत केले होते. मात्र, कोरोनाने पुन्हा उचल खाल्ल्याने ही शर्यत जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगित केली होती. मात्र, आता कोरोना परिस्थिती निवळल्याने त्या दोन्ही शर्यतीस पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकाच दिवशी परवानगी दिली आहे. यामुळे आढळराव पाटलांनी आयोजित केलेली शर्यत ही 11 आणि 12 फेब्रुवारीला लांडेवाडीच्या घाटात होणार आहे. याच स्पर्धेसंदर्भात ते बोलत असतांना त्यांनी डॅा. कोल्हेंना डिवचले असून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी आपणच जास्त प्रयत्न केल्याचे सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com