शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेते 'मातोश्री'कडे रवाना

Shivajirao Adhalrao Patil| Shivsena| शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढाळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याने पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
Shivajirao Adhalrao Patil|
Shivajirao Adhalrao Patil|
Published on
Updated on

डी. के वळसे पाटील

मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याच्या बातमीमुळे आंबेगाव खेड जुन्नर शिरूर हवेली, भोसरी, हडपसर येथील शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान या भागातील प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांना रविवारी मुंबई येथे मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. आज सकाळीच या भागातील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात चाकण येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात आढळराव पाटील यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत असलेल्या त्रासाबद्दल तीव्र शब्दात नाराजी ही व्यक्त केली होती.

Shivajirao Adhalrao Patil|
शिवसेनेचे आमदार फुटत होते तेव्हा वेदना होत होत्या!

शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शक्तिप्रदर्शन करून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला होता. पण आज अचानक प्रसारमाध्यमांमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याची बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला. आढळराव पाटील यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही शिवसेनेला दुर्लक्षित करून चालणार नाही. तीन वेळा ते खासदार होते. त्यांचा या भागातील जनसंपर्क मोठा आहे. गावागावात शिवसेना वाढविण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे.

शिवसेनेच्या मुंबई येथील अनेक नेत्यांनी आज पहाटेपासूनच शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्याशी संपर्क मोहीम राबविली थेट त्यांना बैठकीचे मातोश्रीचे निमंत्रण पाठवले आहे. त्यानुसार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ऍड. अविनाश राहणे, पंचायत समितीचे माजी सदस्य राजाराम बाणखेले, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख सुरेशराव भोर, शिवसेनेच्या नेत्या जयश्री पालांडे, ज्येष्ठ नेतेअशोकराव खांडेभ राड,राम गावडे, महिला जिल्हा संघटक विजयाताई शिंदे, श्रध्दाताई कदम, जेष्ठ उपजिल्हा प्रमुख शिवाजीराजे वर्पे, माजी उपजिल्हा प्रमुख अनिल काशिद,उपजिल्हा प्रमुख रविंद्र गायकवाड,पोपट शेलार,राजेंद्र सोमवंशी,स्वप्निल बेंडे मुंबईला रवाना झाले आहेत.

तर काही शिवसेनेचे पदाधिकारी मात्र आंबेगाव तालुक्यातच असून आज दुपारी लांडेवाडी येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. लांडेवाडी येथे आढळराव पाटील यांना मानणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून झालेल्या कारवाईबद्दल काही कार्यकर्त्यांनी नाराजीचा सुर व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेत आढळराव पाटील काय भूमिका मांडतात यावरच सर्व काही अवलंबून आहे त्यामुळे दुपारी होणाऱ्या आढळराव पाटील यांच्या पत्रकार परिषदेकडे शिवसेना कार्यकर्त्याप्रमाणेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com