Shivsena News : गायकवाडांच्या राहुल गांधींबाबतच्या 'त्या' वादग्रस्त विधानावर शिंदे गटातील नेत्यानेच व्यक्त केली नाराजी

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे सतत वादग्रस्त विधान करत असतात. नुकतेच त्यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रूपयांचे बक्षीस देण्यात येईल, असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
Eknath Shinde, Sanjay Gaikwad, Rahul Gandhi
Eknath Shinde, Sanjay Gaikwad, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 17 Sep : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हे सतत वादग्रस्त विधान करत असतात. नुकतेच त्यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रूपयांचे बक्षीस देण्यात येईल, असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

त्यांच्या या विधानामुळे काँग्रेस नेते प्रंचड आक्रमक झाले आहेत. शिवाय अशा नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी आवर घालावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP SP) देखील गायकवाडांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली असल्याची टीका केली आहे.

अशातच आता शिंदे गटातील नेत्यानेच गायकवाडांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी संजय गायकवाड चुकल्याचं म्हटलं आहे. सत्तार म्हणाले, "संजय गायकवाड बोलताना चुकले आहेत, हे मला वैयक्तिक वाटतं.

Eknath Shinde, Sanjay Gaikwad, Rahul Gandhi
Video Ajit Pawar : शिंदेंच्या आमदारावर अजितदादा भडकले, म्हणाले, नवीन प्रश्न...

पक्ष त्यावर काय बोलेल माहिती नाही, आमचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आमच्या पक्षाचे सर्व अधिकार आहेत. ते जे बोलतील तेच अंतिम राहील. त्यामुळे मला तरी वाटतंय याबाबतीत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि त्याची माहिती आपल्याला सुद्धा देतील."

Eknath Shinde, Sanjay Gaikwad, Rahul Gandhi
Rohit Pawar : "फडणवीस सेफ राहतात अन्...", पडळकरांचा उल्लेख करत रोहित पवारांचा हल्लाबोल

संजय गायकवाड वक्तव्यावर ठाम

संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी काँग्रेसने मागणी केली होती. यावर बोलताना गायकवाड म्हणाले, "राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे. ते वक्तव्य हे माझं वैयक्तिक वक्तव्य आहे. मी वक्तव्य केले मी माफी मागत नाही तर माझे मुख्यमंत्री का माफी मागतील." असं म्हणत गायकवाड यांनी ते वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com