देशपांडेंनी पक्ष सोडताच शिवसेना म्हणाली, ते गेल्यानं काडीचाही फरक पडत नाही!

शाम देशपांडेंनी पक्ष सोडल्यानं राजकारण तापलं
Sham Deshpande
Sham Deshpande Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला (Shivsena) पुण्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पुण्यातील नेते व माजी शहरप्रमुख शाम देशपांडे (Sham Deshpande) यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बीकेसीतील सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्यानं नाराज होऊन देशपांडेंनी पक्ष सोडला आहे. यावर आता शिवसेनेनं अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. याचबरोबर देशपांडे पक्ष सोडणार याची शिवसेनेला आधीपासूनच कुणकुण असल्याचंही समोर आल आहे.

शाम देशपांडे हे पक्षातून गेल्याने काडीचाही फरक पडत नाही, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख गजान थरकुडे म्हणाले की, शिवसेना ही संघटना निष्ठावंतांची आहे. देशपांडेंना तीन वेळा महापालिकेत संधी देण्यात आली. स्थायी समितीचं अध्यक्षपद, गटनेता, शहरप्रमुख ही पदे अन् विधानसभेची उमेदवारी देऊनही ते समाधानी नव्हते. त्यांनी कृतज्ञपणा दाखवण्याऐवजी कृतघ्नपणा दाखवला. ते पक्षातून गेल्यानं काडीचाही फरक शिवसेनेला पडत नाही. शाम देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावेळी स्वागताचे बॅनर लावले होते. त्याचवेळी त्यांची भूमिका स्पष्ट झाली होती.

Sham Deshpande
शिवसेनेला मोठा धक्का; शाम देशपांडेंचा पक्षाला जय महाराष्ट्र!

शाम देशपांडे यांनी म्हटलं आहे की, शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानं अनेक शिवसैनिकांना दु:ख झालं. त्यातच उद्धव ठाकरेंनी संघावर टीका केल्याने आम्हाला क्लेश होत आहे. संघ हा भाजपच्या आधीपासून होता. त्यामुळे संघाला राजकारणात ओढण्याची आवश्यकता नव्हती, असं माझं प्रामाणिक मत आहे. संघाला अशा प्रकारे राजकारणात ओढून उद्धव ठाकरेंनी बेगडी धर्मनिरपेक्षतेचा पदर धरला, अशी माझी भावना आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी संघाच्या आक्रमक हिंदुत्वाला योग्य दिशा दिली. ती दिशा आता भरकटलेली दिसत आहे. संघावर टीका करुन उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची री ओढली आहे. त्यामुळं आजपासून शिवसेनेचं काम थांबवत आहे.

Sham Deshpande
सदाभाऊंचा यू-टर्न! आधी केतकी चितळेचं समर्थन अन् नंतर माघार

शाम देशपांडे हा १९७२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. नंतर ते शिवसेनेत गेले होते. देशपांडे हे पुणे महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक होते. ते शिवसेनेकडून कोथरूडमधून निवडून आले होते. ते २०००-२०१२ या कालावधीत नगरसेवक होते तर २००८-०९ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी बराच काळ शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com