Murlidhar Mohol : मोहोळांचं राजकारणापलिकडचं 'कबड्डी प्रेम'; कट्टर विरोधक असलेल्या ठाकरे गटाच्या स्पर्धेलाच लावली हजेरी

Shivsena Thackeray group: ठाकरे गटाच्या कबड्डी स्पर्धेला भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजप आणि ठाकरे गटात एकमेकांचे पाय ओढणे सुरू असताना भाजपचे माजी महापौर आणि खासदारकीसाठी इच्छुक असलेले मुरलीधर मोहोळ यांनी ठाकरे गटाच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थिती लावल्याचे पहायला मिळाले. (BJP leader Murlidhar Mohol and Pune Politics)

भाजपबरोबर असलेली युती तोडत गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी करत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्रिपदी ठाकरे विराजमान झाले. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी तयार झाली. दीड ते पावणेदोन वर्षापूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजपने सेना फोडत राज्यात सत्तांतर घडविले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Murlidhar Mohol
Ravindra Dhangekar Reaction on Budget : 'हे तर 'गाजर' बजेट, काँग्रेसच्या योजना चोरल्या'; आमदाराने केला मोठा दावा

भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ठाकरे आणि भाजप यांच्यामधील दरी अधिकच वाढत गेली. भाजपने शिवसेनेला फोडत शिवसेनेचा ताबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कसा राहील, यासाठी ताकद लावल्याने भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांमधील नाराजी देखील चांगलीच वाढत आहे. त्यातच शिवसेना कसबा विधानसभा मतदारसंघाच्यावतीने कै.शंकरराव ढमाले स्मृती चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

या स्पर्धेसाठी माजी महापौर आणि शहर भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी आवर्जून हजेरी लावली. खेळाडूंबरोबर संवाद साधत त्यांच्या हस्ते नाणेफेक करुन सामन्याचा प्रारंभ देखील करण्यात आला. या कबड्डी स्पर्धेसाठी मोहोळ यांनी लावलेल्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ हे भाजपकडून इच्छुक उमेदवार आहेत. काही महिन्यांपूर्वी भाजपकडून लोकसभेसाठी मोहोळ यांच्यासह वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक इच्छुक होते. मात्र आता निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे, तशी इच्छुकांची संख्या देखील वाढू लागली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघ प्रचारक सुनील देवधर, फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे शिवाजी मानकर यांनी देखील लोकसभेसाठी पक्षाने संधी दिल्यास आपण इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी आता स्पर्धा चांगलीच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मोहोळ यांचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

दरम्यान, पूना ॲमेच्युअर्स संघाच्यावतीनं कै.शंकरराव ढमाले स्मृती चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पूना ॲमेच्युअर्स संघाचा मी स्वतः खेळाडू राहिलेलो असल्याने या संघाशी माझं भावनिक नातं राहिलेलं आहे. कै.शंकरराव ढमाले यांच्या मार्गदर्शनात मलाही कबड्डीचे धडे शिकायला मिळाले होते. कबड्डीसारख्या अस्सल देशी खेळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी अशा प्रकारच्या स्थानिक पातळीवर स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात, अशी भावना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Murlidhar Mohol
Amit Thackeray Pune Lok Sabha : पुणे लोकसभेचा चेहरा 'राज'पुत्र ठरविणार ? मनसेच्या इच्छुकांची संख्या वाढली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com