Vasant More : वसंत मोरेंचें दोन दगडांवर पाय? 'या' दोन्ही मतदारसंघात करताहेत काम

Shivsena UBT Vasant More News : लोकसभेमध्ये अपेक्षित यश मिळालं नसलं तरी आगामी विधानसभा निवडणूक लढवायची आणि जिंकायची या उद्देशाने वसंत मोरे ठाकरे गटात दाखल झाले आहेत. ठाकरे गटांकडून त्यांना आगामी विधानसभेचे तिकीट देण्याचं शब्द देखील देण्यात आले आहे.
Vasant More
Vasant MoreSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 20 August : गेली कित्येक वर्ष मनसे आणि राज ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेले वसंत मोरे व्हाया 'वंचित' शिवसेना उद्धव ठाकरे गटात पोहोचले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा चंग बांधलेल्या वसंत मोरेंनी आता दोन पर्यायांवर काम करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.

वसंत मोरे 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मनसे आपल्याला लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी देईल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र अपेक्षा भंग झालेल्या मोरेंनी वंचित मध्ये जाऊन निवडणूक लढवली.

मात्र त्यांना यश मिळालं नाही. लोकसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली. त्यानंतर नवीन राजकीय वाट निवडत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचं (Shivsena) शिवबंधन हाती बांधलं. लोकसभेमध्ये अपेक्षित यश मिळालं नसलं तरी आगामी विधानसभा निवडणूक लढवायची आणि जिंकायची या उद्देशाने वसंत मोरे ठाकरे गटात दाखल झाले आहेत. ठाकरे गटांकडून त्यांना आगामी विधानसभेचे तिकीट देण्याचं शब्द देखील देण्यात आले आहे.

Vasant More
Supriya Sule Politics: सुप्रिया सुळे यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना खुले आव्हान!

मात्र, मतदारसंघ कोणता असेल याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे वसंत मोरे (Vasant More) यांच्यासाठी सोयीस्कर असणाऱ्या दोन विधानसभा मतदारसंघात त्यांनी काम करायला सुरुवात केली आहे. वसंत मोरेंना हडपसर विधानसभा मतदारसंघ अथवा खडकवासला या एका मतदारसंघाचं तिकीट देण्याचा शब्द ठाकरे गटाने दिला असल्याचं सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाकडून प्राथमिक जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या असल्या तरी कोणती जागा कोणाला मिळणार? याबाबत अद्यापही स्पष्ट आलेली नाही. त्यामुळे इतर इच्छुकांप्रमाणे वसंत मोरेंनी देखील या दोन मतदारसंघांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाची प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे. यातूनच वसंत मोरे यांचं दोन्ही मतदार संघामधून निवडणूक लढण्याची तयारी असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

Vasant More
Badlapur School Case : बदलापूर अत्याचारप्रकरणी दीपक केसरकर 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; शिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई, तर चार शिक्षक निलंबित

राष्ट्रवादीचे टेन्शन वाढणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. तर दुसरीकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्ती असणारे सचिन दोडके हे इच्छुक आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांसाठी शरद पवार गट देखील आग्रही आहे.

अशातच मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश झाल्याने यातील किमान एक जागा तरी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला सोडावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवारांच्या शिलेदारांचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com