Shivsena UBT News : सेना... मनसेवर भरोसा नाय का? भाजपचा 'तो' इतिहास सांगत पुण्यात ठाकरे सेनेची 'वेगळीच' तयारी!

Pune political updates : मनसेवर विश्वास ठेवता येत नाही, असा सवाल करत ठाकरे सेना पुण्यात वेगळीच तयारी करत आहे. भाजपच्या इतिहासाचा दाखला देत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर ताज्या अपडेट्स.
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्रित निवडणुका लढणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत ठाकरे सेनेच्या नेत्यांकडून उघड उघड वक्तव्य करण्यात येत असले तरी अद्याप मनसेने आपले पत्ते पूर्णपणे खोललेले नाहीत. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू पालिका निवडणुकीत देखील सोबत राहणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तसेच दुसरीकडे मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती झाल्यास महाविकास आघाडीचे चित्र कसं असेल याबाबत देखील संभ्रम आहे. महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यास काँग्रेसचा विरोध असल्याच समोर आला आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास महाविकास आघाडी फुटण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेतील नेते संभ्रम अवस्थेमध्ये आहेत. नेमकी युती आणि आघाडीची चर्चा कोणासोबत करायची हा पेच स्थानिक नेत्यांसमोर निर्माण झाला आहे.

या परिस्थितीमध्ये पुण्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून सर्वच्या सर्व 165 जागांसाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. या अर्जासाठी प्रत्येकी 500 रुपये घेतले जाणार असून अर्ज दाखल करताना दहा हजार रुपये शुल्क भरावा लागणार आहे. महाविकास आघाडी सोबत जायचं का ? मनसे व सोबत युती करायची याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल मात्र त्यापूर्वी पुण्यातील सर्वच्या सर्व जागांवर आम्ही तयार करत असल्याचं स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात आला आहे.

Shivsena UBT News
Worlds First Election : जगातील पहिले मतदान कसे झाले? वेगळाच होता थाट, 'हे' वाचून तुम्हाला बसेल धक्का...

ही भूमिका जाहीर करताना ठाकरे सेनेचे शहर प्रमुख म्हणाले, महाविकास आघाडी, युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. त्याबाबत जो आदेश येईल त्याचे पालन शिवसेना पुणे शहर करणार आहे. युतीबाबत पुर्व इतिहास पाहता भाजपाने शिवसेनेसोबत युती ऐनवेळी तोडली होती. त्यामुळे पुणे शहर शिवसेना गाफील न राहता पूर्ण तयारीत आहे. आणि युती आघाडी झाल्यास ही निवडणूक आम्ही सर्वजण सोबत लढविणार आहोत. असं न झाल्यास सर्वाच्या सर्व जागांची तयारी आमच्याकडून करण्यात आली आहे अस ठाकरे सेनेकडून स्पष्ट करण्यात आला आहे.

Shivsena UBT News
CJI Surya Kant : धक्कादायक : सरन्यायाधीशांसमोर महिला वकिलाचा थयथयाट; कुणालाच जुमानले नाही अन् करायचे ते केलंच...

त्यामुळे मनसे सोबत महापालिका निवडणुकीत युती होईल यावर अद्याप तरी ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांचा पूर्णपणे विश्वास नसल्याचं समोर येत आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने मागील महापालिका निवडणुकीदरम्यान भाजप आणि सेनेची युती होणार असल्याचं सांगितलं जात होत. मात्र शेवटच्या क्षणी ही युतीची बोलणे विस्कटली आणि स्वबळावर निवडणूक लढावी लागली होती. त्याच पद्धतीने यंदा देखील होण्याची शक्यता लक्षात घेता सर्वच्या सर्व जागांवर ठाकरे सेनेकडून तयारी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. सेनेला मनसे वर भरोसा नाही का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com