आमदार संग्राम थोपटेंना शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिंदेंचे आव्हान

पुणे जिल्हा बँकेसाठी आमदार संग्राम थोपटे यांच्याविरोधात शिवसेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे लढणार
Bhalchandra Jagtap-Sangram Thopte-Dnyaneshwar Shinde
Bhalchandra Jagtap-Sangram Thopte-Dnyaneshwar ShindeSarkarnama
Published on
Updated on

नसरापूर (जि. पुणे) : महाविकास आघाडीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. कारण, भोरचे काँग्रेसचे (Congress) आमदार आणि बॅंकेचे विद्यमान संचालक संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्या विरोधात अ वर्ग गटातून शिवसेनेचे (Shivsena) भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे हे रिंगणात उतरले आहेत. शिंदे यांनी ता. ३ डिसेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येत्या सोमवारी (ता. ६ डिसेंबर) आमदार थोपटे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या ड वर्ग गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान संचालक भालचंद्र जगताप यांनी ता. 2 डिसेंबर रोजीच अर्ज दाखल केला आहे. (Shiv Sena taluka chief Dnyaneshwar Shinde will fight against MLA Sangram Thopte for Pune District Bank)

भोर तालुक्यात एकुण 75 सोसायटी असून त्यापैकी 73 सोसायटींचे मतदानाचे ठराव आले आहेत. म्हणजे तालुक्यात अ वर्ग गटात 73 मतदार आहे. आत्तापर्यंत सोसायटी मतदारात काँग्रेसचे प्राबल्य राहिलेले आहे. मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रघुनाथ किंद्रे यांनी माघार घेतल्याने आमदार थोपटे बिनविरोध संचालक झाले होते. यावेळही ते सोमवारी संचालकपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. अ वर्ग गटातून राष्ट्रवादीकडून कोणी इच्छुक नसल्याने यावेळीही थोपटे बिनविरोध होतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी ता.3 डिसेंबर रोजी अ वर्गासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Bhalchandra Jagtap-Sangram Thopte-Dnyaneshwar Shinde
हिंमत असेल तर जयंत पाटलांशिवाय निवडणूक लढवा आणि जिंकून दाखवा!

शिवसेनेला तालुक्यातील सहकार क्षेत्रात अद्याप जम बसविता आलेला नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर शिंदे उमेदवारी कायम ठेवणार का माघार घेणार, याची तालुक्यात चर्चा सुरु आहे. पण, तालुक्यातील सहा ते सात सहकारी संस्थांवर आमचे वर्चस्व असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. एकंदर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या पार्श्वभूमीवर अ वर्गाची भोर तालुक्यातील ही निवड बिनविरोध पार पडण्याचीच शक्यता आहे.

Bhalchandra Jagtap-Sangram Thopte-Dnyaneshwar Shinde
राणेंचा महाविकास आघाडीला धक्का : जिल्हा बॅंकेच्या संचालकाचा भाजपत प्रवेश

याबाबत ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले की, भोर तालुक्यात नाराज मतदारांची संख्या मोठी आहे, त्यांना बदल हवा आहे, त्यासाठीच मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सूचक आणि अनुमोदक यांच्यासह शुक्रवारी (ता. 3 डिसेंबर) अर्ज दाखल केला आहे. निवडणुकीत मला यशाची खात्री आहे.

Bhalchandra Jagtap-Sangram Thopte-Dnyaneshwar Shinde
स्मशानभूमीच्या उद्‌घाटनाला बोलावले की मला धडकीच भरते : फडणवीसांनी सांगितला तो किस्सा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत वरिष्ठ पातळीवरुन अद्याप कोणतेही आदेश आले नाही. भोर तालुक्यातुन अ वर्गासाठी अद्याप कोणाच्या नावाची चर्चाही झालेली नाही. वरिष्ठ पातळीवरुन सूचना आल्यावर पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यात येईल. दरम्यान तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी ड वर्गामधून विद्यमान संचालक भालचंद्र जगताप यांना पुन्हा उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यानुसार जगताप यांनी गुरुवार (ता. 2 डिसेंबर) अर्ज दाखल केला आहे, असेही घोरपडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com