Pune Police PSI Suicide : धक्कादायक! पुणे पोलिस दलातील 'पीएसआय'नं लोणावळ्यातील 'टायगर पॉईंट'ला उचललं टोकाचं पाऊल

PSI Anna Gunjal Sucide News : आता लोणावळा पोलिसांकडून आण्णा गुंजाळ यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण शोधले जात आहे. घटनास्थळावरील चारचाकीमध्ये आढळलेल्या डायरीत गुंजाळ यांनी आत्महत्येसंबंधी काही सुसाईड नोट लिहून ठेवली आहे का,याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
Pune Police
Pune PoliceSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे पोलिस दलातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.पोलीस उपनिरीक्षक (PSI) अण्णा गुंजाळ यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. लोणावळ्यात जाऊन त्यांनी आपलं जीवन संपवल्याचं धक्कादायक बाब समोर आली आहे. लोणावळ्यामधील टायगर पॉईंटलगत झाडाला गळफास घेतल्यानं पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

खडक पोलिस ठाण्यात अण्णा गुंजाळ हे पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी शुक्रवारी (ता.7) लोणावळ्यातील टायगर पॉईंट परिसरात झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आले आहे. अद्याप आत्महत्येचं कारणं स्पष्ट झालेलं नाही.

आण्णा गुंजाळ हे गेल्या तीन दिवसांपासून ड्युटीवर नव्हते. तसेच ते त्यांच्याशी कुटुंबियांचा संपर्कही होत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांच्या कुटुंबियांसह पोलिसांकडूनही गुंजाळ यांचा शोध सुरू होता. अखेर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

Pune Police
Nagpur Politic's : बावनकुळेंनी थेट बैठकीतून अजितदादांना फोन लावला अन्‌ नागपूरसाठी पुन्हा मिळविला 42 कोटींचा निधी

अण्णा गुंजाळ यांनी आत्महत्या केलेल्या लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर त्यांची गाडी आढळून आली आहे. त्यांच्या गाडीत एक डायरीही सापडली आहे. याच डायरीमध्ये गुंजाळ यांच्या आत्महत्येचं कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून खडकी पोलिसांचं एक पथकही लोणावळ्याकडे रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. गुंजाळ यांच्या मृतदेहासह टायगर पाँईटवर आढळून आलेली त्यांची गाडीही पोलिसांनी ताब्यात घेण्यात आली आहे.

Pune Police
Devendra Fadnavis News : फडणवीसांनी एका वाक्यातच राहुल गांधींच्या आरोपांची हवा काढली!

आता लोणावळा पोलिसांकडून आण्णा गुंजाळ यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण शोधले जात आहे. घटनास्थळावरील चारचाकीमध्ये आढळलेल्या डायरीत गुंजाळ यांनी आत्महत्येसंबंधी काही सुसाईड नोट लिहून ठेवली आहे का,याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com