
Pune News : पुण्यातील सदाशिव पेठेत एका चारचाकी गाडीने 12 जणांना उडवल्याची अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. नेहमीच वर्दळ असलेल्या शहरातील या रस्त्यावर एका मद्यधुंद कारचालकानं भरधाव कार चालवत चहा प्यायला आलेल्या टपरीवर आलेल्या एमपीएससीच्या च्या 12 विद्यार्थ्यांना उडवलं.आता या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलसमोर मद्यधुंद चालकानं बेदरकारपणे कार चालवत झालेल्या भीषण अपघातात 13 एमपीएससीचे विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी(ता.31) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या जखमी विद्यार्थ्यांवर ससून, संचेती, मोडत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघातातील आरोपी कारचालक जयराम शिवाजी मुळे (वय 27, रा. बिबवेवाडी, मूळ रा. मुळज ता. उमरगा, जिल्हा धाराशिव) याला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचा जोडीदार राहुल गोसावी,दिगंबर यादव शिंदे यालाही ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेत जेव्हा हा अपघात घडला, तेव्हा या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक हा मद्यसेवन केलं होतं. त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटून अॅक्सिलेटरवर दाब पडला, त्यामुळे कारचं स्पीड अचानक वाढलं.अनियंत्रित झालेल्या कारने या चहाच्या दुकानसमोर पार्क केलेल्या गाड्या आणि तिथे असलेल्या लोकांना धडक दिली. या अपघातामध्ये एकूण 12 जण जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पुणे येथे भावे हायस्कूलजवळ एका भरधाव कारने 12 जणांना उडवल्याची घटना घडली आहे. अपघातात जखमी झालेले हे सर्वजण MPSC चा अभ्यास करणारे विद्यार्थी असल्याची माहिती कळत आहे. हे सर्वजण चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आले होते.विश्रामबाग पोलिसांकडून सखोल तपास करत आहेत.
या अपघातात अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, चिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. यांपैकी तिघांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात तर इतर नऊ जणांना टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात चार विद्यार्थ्यांचे पाय मोडले.
झोन वनचे डीसीपी निखिल पिंगळे यांनी हा अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती दिली. तसेच सदाशिव पेठ हे पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या परिसरात स्पर्धा परिक्षांचे क्लासेस असल्याचे राज्यातील अनेक भागांतून विद्यार्थी या ठिकाणी एमपीएससीची तयारी करण्यासाठी येतात असंही ते म्हणाले.
भावे हायस्कूलजवळ झालेल्या अपघातातील जखमींमध्ये १२ जणांपैकी ९ विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी एमपीएससीची तयारी करणारे असून त्यांची उद्या परीक्षा होणार आहे. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले असून सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च सरकारच्या माध्यमातून करण्याची घोषणा देखील केली आहे.
- हेमंत रासने, आमदार कसबा विधानसभा
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.