Crime News : धक्कादायक! शिवसेना नेते उत्तम खंदारे अडचणीत; महिलेला मारहाण व बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

Shivsena Leader Uttam Khandare : शिवसेनेचे नेते उत्तम खंदारे हे युती सरकारच्या काळात सामाजिक न्याय व क्रीडामंत्री होते.
Uttam Khandare
Uttam KhandareSarkarnama
Published on
Updated on

Pune News : माजी मंत्री व शिवसेनेचे नेते उत्तम प्रकाश खंदारे यांच्याविरोधात लग्नाचे आमिष दाखवून आणि मुलांचा सांभाळ करण्याचं वचन देत बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकऱणी एका 37 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Uttam Khandare
Kasba By Election : कसब्याचे 'किंगमेकर' पुन्हा मैदानात; फडणवीस-बापट भेटीत नेमकं काय घडलं?

शिवसेनेचे नेते उत्तम खंदारे(Uttam Khandare) हे युती सरकारच्या काळात सामाजिक न्याय व क्रीडामंत्री होते. मात्र, आता त्यांच्याविरोधात पुण्यातील एका महिलेनं पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली होती.या तक्रारीनंतर बिबवेवाडी पोलिसांनी उत्तम प्रकाश खंदारे (वय 65, रा. सोलापूर) यांच्यासह महादेव भोसले, बंडू दशरथ गवळी व एका महिलेविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

Uttam Khandare
Udayanraje Bhosale : शिवजयंती दिनी साताऱ्यात उदयनराजेंच्या हस्ते महाआरती

शिवसेने(Shivsena)चे नेते उत्तम खंदारे यांनी पी्डित महिलेला लग्नाचं आमिष दाखवत आणि तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचं आश्वासन देत चाकूच्या धाकाने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.याला फिर्यादीने महिलेने नकार दिला असता तिला विवस्त्र करून पट्ट्यानं मारहाण करत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तसेच मुलाच्या संगोपनासाठी खंदारे यांनी दिलेले धनादेशही बँकेत वटले नाही. शिवाय आरोपीने फिर्यादी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं पीडित महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com