Trupti Desai : गुरुमाऊली प्रकरणात तृप्ती देसाई यांचा पुन्हा मोठा खुलासा; म्हणाल्या 'ती ही महिला नव्हेच..!'

Trupti Desai latest news : स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांनी काही महिलांचे शोषण केले असाही आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता.
Trupti Desai
Trupti DesaiSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने सबंध महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले असताना. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी समोर येत वाल्मीक कराड हा नाशिक येथील एका मठामध्ये लपून बसला होता असं आरोप केला आहे. तसेच स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांनी काही महिलांचे शोषण केले असाही आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता.

तृप्ती देसाई यांच्या या आरोपानंतर या प्रकरणाला आता नवीन वळणं लागला आहे. लैंगिक शोषणाचे आरोप केलेल्या त्या महिलेने यु टर्न घेतला असून आपण दबाव पोटी ती तक्रार दिल असल्याचा खुलासा केला आहे. तसेच मोरे आणि आपल्याला बदनामी करण्याचे हे षडयंत्र असल्याचे देखील या महिलेने नमूद केलं आहे. यानंतर पुन्हा एकदा तृप्ती देसाई यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Trupti Desai
Shiv Sena: शिंदेंची सेना फुटीच्या मार्गावर? आग लागल्याशिवाय धूर निघणार नाही! शरद पवारांच्या खासदाराचे सूचक वक्तव्य

तृप्ती देसाई म्हणाल्या, मोरे यांनी लैंगिक शोषण केलं असल्याबाबतच्या तीन महिलांच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. याबाबत लवकरच आम्ही पोलीस तक्रार देखील देणार आहे. तसेच आणखी काही तक्रारी आमच्याकडे येत आहेत.

दरम्यानच्या, काळामध्ये सोनवणे नामक एका महिलेने नाशिकमध्ये समोर येत, 'मी आशा प्रकारची कोणतीही तक्रार केली नसल्याचे सांगितलं आहे. मात्र आमच्याकडे आलेल्या तक्रारी या वेगळ्या महिलांच्या असून त्यामध्ये सोनवणे यांची तक्रारच नाही. मात्र सोनवणे यांनी दाबावापोटी ही तक्रार दिली होती. असा खुलासा केला असल्याने या तक्रारीच्या देखील मुळाशी जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचं देसाई यांनी सांगितला आहे.

Trupti Desai
Kolhapur News : शिंदेच्या शिवसेनेला बळ; पण स्वकियांच्या नाराजीने शिवसैनिक द्विधा मनस्थितीत

ज्या महिलेबाबत आम्हाला माहीतच नाही अशा महिलेला समोर आणून स्वतःचं पाप झाकण्याचं काम अण्णा मोरे का? करत आहेत. हा प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचा आहे. त्यासाठी आम्ही सविस्तर पत्रकार परिषद घेणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com