Kolhapur News : शिंदेच्या शिवसेनेला बळ; पण स्वकियांच्या नाराजीने शिवसैनिक द्विधा मनस्थितीत

Eknath Shinde Shivsena vs Uddhav Thackeray Shivsena : अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत दुफळी पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीरपणे एका होऊ लागली.
Eknath Shinde vs uddhav thackeray
Eknath Shinde vs uddhav thackeray Sarkarnama
Published on
Updated on

एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आणि दोन खासदार असताना मंत्रीपदाबाबत उपेक्षितच ठेवण्यात आलं होते. त्यामुळे शिवसेनेतील आमदार खासदारांमध्ये नेहमीच अंतर्गत खदखद होती. जिल्ह्याला सहा आमदार देऊनही मंत्रिपद न दिल्यामुळे सातत्याने पक्षप्रमुखांवर अंतर्गत टीकेची झोड उडत होती. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत दुफळी पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीरपणे एका होऊ लागली.

शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्याने इतके दिले पण पक्षप्रमुखांनी सेना जिवंत ठेवण्यासाठी काय केले? असे प्रश्न जाहीररीत्या मांडले जाऊ लागले. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेतृत्व हातात घेतल्यानंतर जिल्ह्यात चांगले दिवस आले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत एका आमदारावर असलेली शिवसेना यंदा चार आमदारांवर पोहोचली. शिवसेनेच्या दृष्टीने पुन्हा एकदा ही चांगली बाब असली तरी मिळालेल्या मंत्रीपदावर अंतर्गतच दुफळी माजली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती सरकारच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात दहापैकी सहा जागांवर शिवसेनेने यश मिळवले. तर भाजपला दोन जागांवर समाधान मानावे लागले. इतके आमदार निवडून येऊन देखील शिवसेनेला मंत्री वाटपात निराशा मिळाले. भाजपकडून महसूल मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात एकमेव आमदार प्रकाश आबिटकर निवडून आले. मात्र युतीशी फारकत घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने युती करत सरकार स्थापन केले. मात्र यावेळी देखील शिवसेनेला मंत्रिपद डावलण्यात आले.

Eknath Shinde vs uddhav thackeray
Shiv Sena: शिंदेंची सेना फुटीच्या मार्गावर? आग लागल्याशिवाय धूर निघणार नाही! शरद पवारांच्या खासदाराचे सूचक वक्तव्य

अडीच वर्षानंतर शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असे दोन मत प्रवाह निर्माण झाले. शिंदे यांची शिवसेना भाजपसोबत (BJP) सत्तेत राहिली. त्यावेळी देखील आमदार प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेला जिल्ह्यात मंत्रीपद न मिळाल्याने पक्षसंघटन ला फटका बसला. एकत्र राहणारा निष्ठावंत दोन शिवसेनेमध्ये दुभंगला गेला. शिंदेंच्या शिवसेनेकडे तीन माजी आमदार राहिले. सध्या तिहेरी आमदार विद्यमान आहेत. शिंदेंच्या शिवसेनेसाठी हा पक्ष संघटन साठी मोठा राजकीय आधार समजला जातो.

शिवाय लोकसभा निवडणुकीत देखील दोन्ही जागा मिळवण्यासाठी शिंदे यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे मानले जातात. याउलट ठाकरेंच्या शिवसेनेने (Shivsena) एक जागा गमावून पक्षासोबत कार्यकर्त्यांची ही नुकसान केले आहे. मात्र याची खबरदारी तंतोतंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली दिसून आली. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत झाला. कार्यकर्ते आणि आमदारांना दिलेली बळ हे शिंदे यांच्या पथ्यावर पडले. विधानसभा निवडणुकीत तिन्ही जागांवर शिंदे यांचे शिवसैनिक तर एका अपक्षाचा विजय झाला.

Eknath Shinde vs uddhav thackeray
Delhi Election 2025 : दिल्ली काबीज करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा मास्टर प्लॅन; असा उडवणार धुरळा

केवळ आमदार निवडून आले म्हणून थांबले नाहीत तर सलग तीन वेळा निवडून आलेल्या आणि दुर्गम भागातील आमदार प्रकाश आबिटकर यांना मंत्रीपदावर विराजमान केले. सध्या कोल्हापूर शहरासह आजूबाजूच्या परिसरात निष्ठावंत शिवसैनिक आजही शिंदे गटावर टीका करताना दिसत आहेत. तर ग्रामीण भागातील शिवसैनिक आज ही गटातटासह नेत्यांवर अवलंबून आहे. प्रकाश आबिटकर यांच्या रूपाने ग्रामीण भागातील शिवसेना ही अस्तित्वाचा विस्तार करू शकते.

एकीकडे शिवसेनेमध्ये हे चित्र असताना दुसरीकडे मंत्रीपद आणि पालकमंत्री पदावरून अंतर्गत आमदारांची नाराजी आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी देखील पालकमंत्री आणि मंत्री पदावर दावा केला होता. मात्र त्यांनाही मंत्रीपदापासून दूर ठेवल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. इतकेच नव्हे तर आबिटकर यांच्या स्वागतासाठी देखील उपस्थित राहिले नाहीत. वारंवार त्यांना पालकमंत्री पदाची आस खुणावत चालली आहे. आता त्यातूनच अंतर्गत खदखदीची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेला पहिल्यांदाच पालकमंत्री पद मिळाल्याने शिवसेनेसाठी ही अत्यंत समानधारक बाब आहे. मात्र अंतर्गत खदखद हीच पक्ष वाढीसाठी घातक ठरणार अशी शक्यता आता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com