Video Pune Bar Drugs Case : कल्याणीनगर अपघातानंतर शहरातील 188 बार, पबवर कारवाई

State Excise Department : दोन दिवसांपूर्वी एफ सी रोडवरील एका हॉटेल, बारमध्ये ड्रग्जची पार्टी झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोहिम अधिक कडकपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 14 पथकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे.
Pune Bar Drugs Case
Pune Bar Drugs CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील 'एल 3' या हॉटेल बारमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीच्या प्रकारानंतर शहरातील बेकायदा पब आणि बारवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

यामुळे गेले अनेक महिन्यांपासून झोपी गेलेला राज्य उत्पादन शुल्क विभाग आता खडबडून जागा झाला आहे. गेल्या महिन्यात कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणानंतर आतापर्यंत शहरातील 188 बार,पब यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली.

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श कार चालवून अपघात केला होता. गेल्या महिन्यात 19 मे रोजी मध्यरात्री हा प्रकार घडला होता. या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

हा अल्पवयीन मुलगा मोठ्या प्रमाणात दारू प्यायला होता. त्याच अवस्थेत त्यांनी गाडी चालवून हा अपघात केल्याचे पोलिसांनी (Police) केलेल्या तपासात समोर आले होते. या घटनेनंतर शहरातील विविध भागांमध्ये रात्रभर चालणाऱ्या या पब, बारचा प्रश्न समोर आला होता. या घटनेनंतर अॅक्टिव्ह मोडवर आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता बेकायदा पद्धतीने सुरू असलेल्या बार, पबची पाहणी करून कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

Pune Bar Drugs Case
Video Pune Bar Drugs Case Update : फर्ग्युसन रस्त्यावरील 'त्या'बार, हॉटेलवर महापालिकेने केली कारवाई !

गेल्या महिनाभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने 188 बार, पबवर कारवाई सुरु केली आहे. या बार, पबला दिलेले परवाने तपासले जात आहेत. यापैकी 69 पब, बारचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर 6 पब, बारचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

उर्वरित आस्थापनांना आवश्यक त्या नोटिसा पाठवून त्यांच्याकडून खुलासे मागविण्यात आले आहेत. त्यांचे खुलासे समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Pune Bar Drugs Case
Chandrakant Patil Vs Ravindra Dhangekar : चंद्रकांतदादांनी ठेवलं धंगेकरांच्या दुखऱ्या नसेवर बोट; म्हणाले...

दोन दिवसांपूर्वी एफ सी रोडवरील एका हॉटेल, बारमध्ये ड्रग्ज (Drugs) ची पार्टी झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोहिम अधिक कडकपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी 14 पथकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. याबरोबरच 3 विशेष पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. या 14 पथकांमध्ये प्रत्येकी 8 जणांचा समावेश असणार आहे. ही तपासणी पथके पुणे व पिंपरी-चिंचवड मधील सर्व पब, बार व रेस्टॉरंटची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे.

यामध्ये या आस्थापना रात्री ठरलेल्या वेळेनंतरही सुरू असतात का?, अल्पवयीन मुलांना मद्य दिले जाते का? पब, बारच्या बाहेर मद्याची विक्री केली जाते का?, याची तपासणी प्रामुख्याने केली जाणार आहे.

यामध्ये नियमांचे उल्लंघन आढळल्यास त्या पबचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली जाणार आहे. पब, बारच्या बाहेर मद्याची विक्री होत असेल, तर त्या पब, बारवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक चरणसिंह राजपूत यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com