Mumbai News : लोकसभा निवडणूका पार पडल्यानंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत.आमदारांतून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. येत्या 12 जुलै रोजी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
एकीकडे विधिमंडळाच्या अधिवेशन सुरु असतानाच दुसरीकडे विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी 'फिल्डिंग' लावली जात आहेत. याचदरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
विधानपरिषदेच्या 11 जागांपैकी भाजपच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत तर अजित पवार गटाच्या वाट्याला दोन तर शिंदे गटाच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत. तर उर्वरित दोन जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहेत.भाजपकडे येणाऱ्या पाच जागांसाठी 35 जणांनी उमेदवारी भाजपकडे मागितली होती.यांपैकी पाच नावे फायनल केली जाणार आहेत.
याचदरम्यान,सोशल मीडियावर भाजपच्या संभाव्य उमेदवारांची नावे टाकलेली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे 'लेटरहेड' वापरलेली यादी व्हायरल झाली आहे.मात्र, या यादीसाठी वापरण्यात आलेले बावनकुळेंचं लेटरहेड हे बनावट असल्याची खळबळजनक माहिती पुढे येत आहे.
आगामी काळात होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून एक नाव फायनल करण्यात आले आहेत तर उर्वरित चार जागांसाठी 10 नावांपैकी चार जणांची नावे निश्चित करण्यात येणार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून व काँग्रेसकडून जवळपास नावे निश्चित करण्यात आले असल्याचे समजते.
भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बनावट लेटरहेड वापरुन व्हायरल करण्यात आलेल्या संभाव्य उमेदवारांची यादी प्रसिध्द झाली आहे. त्या यादीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankja Munde), हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, परिणय फुके, सुधाकर कोहळे, अमित गोरखे, निलय नाईक, योगेश टिळेकर, माधवीताई नाईक या दहा नावांचा समावेश आहे. पण आता ही संभाव्य उमेदवारांची नावे टाकून बावनकुळेंच्या बनावट लेटरहेडचा वापर करुन कुणीतरी खोडसाळपणा केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.