

Baramati News : माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांचे बुधवार (ता. 28 जानेवारी) रोजी अकाली निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने एक प्रभावी नेतृत्व हरपले. माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदासह ‘ब’ वर्ग संस्था मतदार संघातील संचालकपदाची जागाही रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर सहकार कायद्यानुसार "ब" वर्ग संचालकपदाची रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया बुधवार (ता.18) रोजी माळेगाव संचालक मंडळ व प्रशासन पातळीवर पुर्ण होणार आहे, अशी माहिती उपाध्यक्षा सौ. संगिता कोकरे यांनी दिली.
माळेगाव कारखान्याच्या भविष्यासंदर्भात एक महत्त्वाची चर्चा सभासदांमध्ये सुरू झाली आहे. कै. अजित पवार यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीच माळेगाव कारखान्याची धुरा हाती घ्यावी, अशी जोरदार मागणी सभासदांकडून होत आहे.
दिवंगत अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याला केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम केले नाही, तर शेतकरी, ऊस उत्पादक आणि कामगार यांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची दिशा दिली. सहकार क्षेत्राबद्दल सकारात्मक दृष्टी असलेल्या सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यास कारखान्याच्या कामकाजात सातत्य राहील, अशी भावना उपाध्यक्षा सौ.कोकरे यांनी व्यक्त केली.
सभासदांचा आदरभावनेला अधिकृत स्वरूप देत बारामती खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाने संस्था प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माळेगाव साखर कारखाना प्रशासनाकडे शिफारस केल्याची माहिती समोर आली. ही शिफारस सहकार क्षेत्रात महत्त्वाची मानली जात असून, आगामी निर्णय प्रक्रियेत तिचे वजनदार महत्त्व राहणार आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार ज्या पद्धतीने राज्याच्या विकासाला गती देतील, त्याच धर्तीवर माळेगाव साखर कारखान्याच्या आधुनिकीकरण, आर्थिक सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविल्या जातील, अशी अपेक्षा बापुराव पडर आदी सभासद व्यक्त करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.