Sunetra Pawar Politics : सुनेत्रा पवारांनी वाढवले भाजपचे टेन्शन; आमदारकीच्या तीन जागा फिक्स?

Sunetra Pawar NCP MLC Election : महायुतीमध्ये 'स्थानिक' विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या जागांच्या मागणीबाबत स्पष्टपणे सांगितले आहे.
Sunetra Pawar intensifies pressure on BJP as NCP demands three seats in Maharashtra Legislative Council elections.
Sunetra Pawar intensifies pressure on BJP as NCP demands three seats in Maharashtra Legislative Council elections.sarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar News : स्थानिक स्वराज संस्थामधून तब्बल 17 विधान परिषदेचे आमदार जाणार आहे. ही निवडणूक आयोगाने जाहीर देखील केली आहे. मात्र, महायुतीमध्ये जागा वाटपावरून पेच निर्माण झाला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहा जागांसाठी आग्रही आहेत. मात्र, भाजप त्यांना येवढ्या जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यातच राष्ट्रवादीच्या वाट्याला एक जागा येईल, अशी चर्चा असताना उपमुख्यमंती सुनेत्रा पवारांच्या मागणीमुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे.

सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, माझी भूमिका हीच आहे की, जिथे आमची संख्या जेथे जास्त आहे. तेथे आम्हाला विधान परिषदेची सीट मिळाली पाहिजे. सकारात्मक चर्चा सुरू आहे. आणि तसं होईल देखील.

राष्ट्रवादीची नेमकी किती जागांची मागणी आहे? याचे उत्तर देखील सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिले. त्या म्हणाल्या, आमची तीन जागांची मागणी आहे. आणि नक्कीच आम्हाला सकारात्मक उत्तर मिळेल.

महायुतीची संख्याबळ पाहता ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, जागा वाटपावरून महायुतीमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. एकनाथ शिंदे हे सहा जागांसाठी आग्रही असताना आता राष्ट्रवादीकडून देखील तीन जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप नेमकी काय भूमिका घेणार याची चर्चा सुरू झाली आहे.

Sunetra Pawar intensifies pressure on BJP as NCP demands three seats in Maharashtra Legislative Council elections.
Maharashtra MLC election: विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये रणकंदन! संख्याबळावरून मित्रपक्षात जोरदार खडाजंगी; उपमुख्यमंत्र्यांच्या 'ठाण्या'सह 7 जागांवरून ठिणगी!

मविआ निवडणूक लढणार

महाविकास आघाडी देखील ही निवडणूक लढणार आहे. सर्व 17 जागांवर उमेदवार देणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. ते म्हणाले, आम्ही सर्व जागा लढणार आहोत. महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढणार असून 29 तारखेला मविआची बैठक होणार आहेत. त्यावेळी कोण कोणती जागा लढणार हे निश्चित केले जाईल.

CM फडणवीस यांची अमित शाहांशी चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये स्थानिक विधान परिषदे निवडणुकीबाबत तसेच उमेदवारांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मित्र पक्षांसोबत जागा वाटपाच्या तिढ्याबाबत देखील त्यांची चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

Sunetra Pawar intensifies pressure on BJP as NCP demands three seats in Maharashtra Legislative Council elections.
MahaYuti seat sharing : एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाण बैठकीत नेमके काय घडले? विधान परिषदेच्या 'त्या' एका जागेसाठी महायुतीत प्रचंड धुसफूस; थेट दिल्लीत धाव!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Sunetra Pawar
Sunetra Pawar MLC Election
Ajit Pawar, Sunetra Pawar
Sunetra Pawar
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com